Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना "नवरत्न" पुरस्कार

भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना "नवरत्न" पुरस्कार

NEWS डंका 4 months ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सन्मानित

भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना मुंबईतील सहारा सिटी हॉटेल येथे झालेल्या हिंदी दैनिक नवभारत टाइम्स च्या ७५ व्या वर्धापन दिन समारंभात 'नवरत्न' पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वेंगसरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वेंगसरकर यांच्यासह उद्योगपती हर्ष गोएंका, नादीर गोदरेज, गीतकार आणि शायर जावेद अख्तर, कवी आणि गीतकार प्रसून जोशी, सिने अभिनेता सनी देवल, ख्यातनाम वैज्ञानिक एम.एम. शर्मा, नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे एम.डी. सी.ई.ओ. आशिष कुमार चौहान, टाटा मेमोरियल सेंटर चे डॉक्टर सुदीप गुप्ता अशा विविध क्ष्रेतातील मान्यवरांना देखील या पुरस्काराने गौरविण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka