Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारतीय हवाई दलाला मिळाल्या पहिल्या महिला 'टॉप गन'

भारतीय हवाई दलाला मिळाल्या पहिल्या महिला 'टॉप गन'

NEWS डंका 2 weeks ago

स्क्वॉड्रन लीडर भावना कांत यांनी रचला इतिहास

भारतीय हवाई दलाच्या इतिहासात आणखी एक सुवर्णक्षण नोंदवला गेला आहे. स्क्वॉड्रन लीडर भावना कांत या भारतीय हवाई दलाच्या प्रतिष्ठित 'फायटर कॉम्बॅट लीडर' अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक ठरल्या आहेत.

या यशामुळे त्यांना हवाई दलातील प्रतिष्ठेचा 'टॉप गन' दर्जा प्राप्त झाला आहे.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे असलेल्या टॅक्टिक्स अँड एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (TACDE) या भारतीय हवाई दलाच्या अत्यंत प्रतिष्ठित प्रशिक्षण केंद्रात हा २० आठवड्यांचा कठीण अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. या अभ्यासक्रमात केवळ उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडक लढाऊ वैमानिकांनाच प्रवेश दिला जातो. यशस्वी उमेदवारांना गुंतागुंतीच्या हवाई मोहिमांचे नेतृत्व करण्याची आणि युद्धनीती विकसित करण्याची जबाबदारी सांभाळण्यास सक्षम मानले जाते.

२०१६ मध्ये पहिल्या महिला फायटर पायलटच्या तुकडीचा भाग

बिहारमधील दरभंगा येथील भावना कांत यांना जून २०१६ मध्ये भारतीय हवाई दलात अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्या अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंह यांच्यासह भारताच्या पहिल्या महिला फायटर पायलटच्या तुकडीतील सदस्य होत्या. महिलांसाठी लढाऊ वैमानिक शाखा खुली झाल्यानंतर या तिघींनी भारतीय हवाई दलात नवा इतिहास घडवला होता.

भावना कांत यांनी यापूर्वीही अनेक महत्त्वाचे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. २०१९ मध्ये त्या मिग-२१ बायसन या लढाऊ विमानावर दिवसा लढाऊ मोहिमा पार पाडण्यासाठी पात्र ठरणाऱ्या भारतातील पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या. त्यानंतर त्यांनी सुखोई-३० एमकेआय हे अत्याधुनिक लढाऊ विमानही उडवले. २०२१ च्या प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणाऱ्या त्या पहिल्या महिला फायटर पायलट ठरल्या, तसेच २०२४ च्या प्रजासत्ताक दिन फ्लायपास्टमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता.

कॅलिफोर्नियात ट्रेकिंगला गेलेल्या भारतीय वंशाच्या पीएचडी विद्यार्थ्याचा मृत्यू

मुलांच्या मानसिक आरोग्याशी खेळ महागात; मेटाला ४,७०० कोटींचा दणका

भारताच्या हवाई शक्तीला नवे पंख! 'मेक इन इंडिया' अंतर्गत बनणार ९४ लढाऊ विमाने

'व्योममित्र' उघडणार भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेचे दार

'टॉप गन' दर्जा का महत्त्वाचा?

'फायटर कॉम्बॅट लीडर' अभ्यासक्रम हा भारतीय हवाई दलातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेचा प्रशिक्षण कार्यक्रम मानला जातो. या प्रशिक्षणात हवाई युद्धनीती, शत्रूच्या विमानांविरोधातील रणनीती, विविध प्रकारच्या लढाऊ मोहिमांचे नियोजन, नेतृत्व कौशल्य आणि अत्याधुनिक हवाई लढाईचे तंत्र शिकवले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे वैमानिक हवाई दलातील सर्वोच्च दर्जाच्या युद्धतज्ज्ञांमध्ये गणले जातात.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka