Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बिल्डरला जीवे मारण्याची धमकी; १२ सराईत गुंड जेरबंद

बिल्डरला जीवे मारण्याची धमकी; १२ सराईत गुंड जेरबंद

NEWS डंका 3 weeks ago

गुंड झुल्फिकार बेहलीमlला अटक

बांधकाम व्यावसायिकाकडे २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कुख्यात गुंड झुल्फिकार बेहलीम, त्याचा भाऊ मोहसीन बेहलीम आणि त्यांच्या टोळीतील आणखी १० साथीदारांना मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-९ ने रंगेहाथ अटक केली आहे.

एकूण १२ सराईत गुंडांना खंडणीची रक्कम स्वीकारताना सापळा रचून पकडण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून झुल्फिकार बेहलीम आणि त्याच्या साथीदारांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडे कंत्राटी काम सुरू करण्यासाठी २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. मागणी पूर्ण न केल्यास शस्त्राने ठार मारण्याची धमकीही देण्यात आली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर गुन्हे शाखेच्या कक्ष-९ ने २७ जुलै रोजी वांद्रे परिसरात सापळा रचला आणि खंडणीची रक्कम स्वीकारताना सर्व आरोपींना अटक केली.

प्रियांका वड्रा-शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यात जुंपली

माहीममध्ये भरधाव केटीएममुळे दुचाकीस्वार, महिलेचा मृत्यू

देशाचा सुवर्णसाठा ८८० टनांवर

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच शस्त्र अधिनियमाच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्राथमिक तपासात अटक करण्यात आलेले सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून झुल्फिकार बेहलीम याच्यावर यापूर्वीही मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. तो सध्या जामिनावर बाहेर होता. या टोळीने मुंबई आणि उपनगरातील अनेक व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यामुळे अशा प्रकारे खंडणीची मागणी झालेल्या नागरिकांनी तातडीने मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-९ किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka