Dailyhunt
'बिन शर्ट' आंदोलनाप्रकरणी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना अटक

'बिन शर्ट' आंदोलनाप्रकरणी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना अटक

NEWS डंका 2 months ago

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

भारतात पार पडलेल्या एआय समिट दरम्यान शर्ट शिवाय निषेध केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी पहाटे भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांना अटक केली आहे.

एआय समिटच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध शर्टलेस निषेध आणि घोषणाबाजी केल्याप्रकरणी ही आठवी अटक आहे. पोलिसांनी चिब यांना टिळक मार्ग पोलिस ठाण्यामध्ये ताब्यात घेतले आहे. ठाण्याबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली असून सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांचे जवान गेटवर तैनात आहेत. दिल्ली पोलिसांनी कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.

सुमारे २० तास चौकशी केल्यानंतर युवक काँग्रेस प्रमुखांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे, सरकारी कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने नुकसान पोहोचवणे, कामावर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना अडथळा आणणे आणि जाणूनबुजून आज्ञाभंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस बिन शर्ट निषेधाला नियमित निषेध म्हणून पाहत नसून एआय इम्पॅक्ट समिटमध्ये जागतिक मान्यवरांसमोर जाणूनबुजून भारताची प्रतिमा खराब करण्याचा दृष्टिकोन तपासत आहेत. अटक केलेले सात आरोपी युवक काँग्रेसशी जोडलेले आहेत.

एअर ऍम्ब्युलन्स अपघात: खराब हवामानामुळे मार्ग बदलासाठी केलेला आपत्कालीन कॉल

ड्रॅगनच्या जाळ्यातून महाराष्ट्र देशाला मुक्त करणार

गांधी कुटुंबाने मला ७ महिने भेटच दिली नाही!

द केरळ स्टोरी २ ला प्रचारकी म्हणणाऱ्या अनुराग कश्यपला झापले

काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून केंद्र सरकारवर हल्ला करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल यांनी एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, दिल्ली पोलिसांनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि इतर तरुण सहकाऱ्यांना बेकायदेशीरपणे अटक केल्याचा तीव्र निषेध करतो. 'हुकूमशहा-शाह' सरकार हे विसरत आहे की लोकशाहीमध्ये, तरुणांनी आवाज उठवणे, प्रश्न विचारणे आणि निषेध करणे हा गुन्हा नाही, तर लोकशाहीचे सर्वात मजबूत शस्त्र आहे.'

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka