Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
छत्तीसगडमधील नक्षलमुक्त पोलमपल्लीमध्ये कायमस्वरूपी रेशन दुकान सुरू!

छत्तीसगडमधील नक्षलमुक्त पोलमपल्लीमध्ये कायमस्वरूपी रेशन दुकान सुरू!

NEWS डंका 2 weeks ago

ग्रामस्थांना मोठा दिलासा

केकाळी नक्षलवादाचा जबरदस्त प्रभाव असलेले छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील पोलमपल्ली गाव आता नक्षलमुक्त होताच विकासाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. नक्षलमुक्त झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत येथे ग्रामस्थांसाठी कायमस्वरूपी रेशन दुकान सुरू करण्यात आले असून, त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी गावात रेशनचे वितरण पंचायत भवन किंवा शाळेत तात्पुरत्या व्यवस्थेद्वारे केले जात होते. यामुळे ग्रामस्थांना लांब रांगेत उभे राहून अनेकदा गैरसोयींचाही सामना करावा लागत होता. मात्र आता पोलमपल्ली गावात स्वतंत्र आणि कायमस्वरूपी रेशन दुकान सुरू झाल्याने नागरिकांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.

रेशन कार्ड मिळाल्यानंतर चांगल्या दर्जाचे धान्य मिळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. एका स्थानिक नागरिकाने सांगितले की, आता अनेक तास रांगेत उभे राहण्याची गरज पडत नाही आणि वेळेवर सहज धान्य मिळते. तर रेशन दुकानातील विक्रेत्याने सांगितले की, ते दररोज सुमारे ३० ते ३५ रेशन कार्डधारकांना धान्याचे वितरण करतात. ही सुविधा पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दिली जात आहे. केंद्र सरकारची ही महत्त्वाची अन्न सुरक्षा योजना देशातील सुमारे ८० कोटी पात्र रेशन कार्डधारकांना मोफत धान्य उपलब्ध करून देते. या योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब श्रेणीतील लाभार्थ्यांना दरमहा प्रति व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ किंवा गहू दिला जातो.

इराणकडून होर्मुझमध्ये चीनच्या जहाजावर हल्ला

महुआ मोइत्रा यांच्यासमोर विमानात 'चोर चोर, टीएमसी चोर'च्या घोषणा

ट्रम्प यांनी लादलेले १०% जागतिक शुल्क बेकायदेशीर

होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका- इराणमध्ये गोळीबार

सरकारने ही योजना १ जानेवारी २०२४ पासून पुढील पाच वर्षांसाठी, म्हणजे डिसेंबर २०२८ पर्यंत वाढवली आहे. गरीब कुटुंबांना आर्थिक आणि अन्न सुरक्षा देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय आता लाभार्थ्यांना पोषणयुक्त फोर्टिफाइड तांदूळही उपलब्ध करून दिले जात आहेत. ही योजना 'वन नेशन, वन रेशन कार्ड' व्यवस्थेअंतर्गत कार्यरत आहे. याचा फायदा असा की, लाभार्थी देशात कुठेही आपल्या रेशन कार्डचा वापर करून मोफत धान्य मिळवू शकतात. पोलमपल्ली गावात सुरू झालेले नवे रेशन दुकान आता ग्रामस्थांसाठी केवळ सुविधा नसून विकास आणि विश्वासाचे नवे प्रतीक बनले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka