Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चीनमध्ये ५.३ तीव्रतेचा भूकंप; दोघांचा मृत्यू

चीनमध्ये ५.३ तीव्रतेचा भूकंप; दोघांचा मृत्यू

गुआंग्शी प्रांतातील लिउझोउ परिसरात अनेक इमारती कोसळल्या, रात्रभर बचावकार्य सुरू

चीनच्या दक्षिणेकडील गुआंग्शी झुआंग स्वायत्त प्रदेशात सोमवारी (१८ मे) पहाटे झालेल्या ५.३ तीव्रतेच्या भूकंपामुळे नुकसान झाले आहे.

चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआ आणि सरकारी प्रसारक CCTV यांच्या माहितीनुसार, या भूकंपात किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. अधिकाऱ्यांनी मृतांचे मृतदेह घटनास्थळावरून बाहेर काढल्याची पुष्टी केली आहे.

भूकंपानंतर चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना दुखापती झाल्या असल्या तरी कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रभावित भागात किमान १३ इमारती कोसळल्या असून खबरदारीचा उपाय म्हणून लिउझोउ शहरातून ७ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. चायना अर्थक्वेक नेटवर्क्स सेंटर (CENC) च्या माहितीनुसार, हा भूकंप स्थानिक वेळेनुसार रात्री १२:२१ वाजता झाला. त्याचे केंद्र गुआंग्शी प्रदेशात होते आणि त्याची खोली जमिनीखाली सुमारे ८ किलोमीटर इतकी नोंदवण्यात आली. कमी खोलीमुळे धक्के अधिक तीव्रतेने जाणवले आणि अनेक भागांमध्ये घाबरलेले लोक घराबाहेर पडले.

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये बचाव पथकांना रात्रभर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेताना दिसत आहे. अनेक इमारती कोसळल्याची दृश्येही समोर आली आहेत. सोमवारी सकाळपर्यंत मदत आणि बचावकार्य अखंड सुरू होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ५१ अग्निशमन आणि बचाव वाहने या मोहिमेत तैनात करण्यात आली असून ३०० हून अधिक कर्मचारी मदतकार्यात गुंतले आहेत.

प्रशासनाने असेही स्पष्ट केले की, दूरसंचार व्यवस्था, वीजपुरवठा, पाणी आणि गॅस सेवा सुरळीत सुरू आहेत. मात्र रेल्वे मार्ग आणि इतर वाहतूक पायाभूत सुविधांची तपासणी सुरू असून काही भागांमध्ये वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते, अलीकडील वर्षांतील भूकंपांच्या तुलनेत यावेळी लिउझोउ परिसर सर्वाधिक प्रभावित झाला आहे. हे शहर लियू नदीच्या किनारी वसलेले असून दक्षिण चीनमधील चुनखडीच्या डोंगराळ भूभागाने वेढलेले आहे.

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद बॉम्बहल्ला प्रकरणातील दोघांना मुंबईतून अटक

पंतप्रधान मोदींचा 'रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार - कमांडर ग्रँड क्रॉस' पुरस्काराने सन्मान

माहिती आहे का? ३.५ अब्ज वर्षांपूर्वी मंगळ ग्रहावर आली होती भीषण महापूरस्थिती

३० वर्षे जपानमध्ये…१८ वर्षे चालवलेले रेस्तराँ बंद करून यावं लागणार भारतात!

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात चीनच्या ताब्यातील तिबेटलगत हिमालयाच्या पायथ्याशी ७.१ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला होता. त्या भूकंपात किमान १२६ जणांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो घरे उद्ध्वस्त झाली होती. त्या भूकंपाचे धक्के नेपाळ, भूतान आणि भारतातही जाणवले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka