Dailyhunt
चिनी रिफायनरीकडे रांगा, म्हणून भारताकडे याचना

चिनी रिफायनरीकडे रांगा, म्हणून भारताकडे याचना

NEWS डंका 1 month ago

तेल दर नियंत्रणासाठी अमेरिकेची मजबुरी

ध्य-पूर्वेत इराण वर इस्रायल आणि अमेरिका यांनी केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर जागतिक तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, रशियन तेल खरेदी केल्यामुळे भारतावर अतिरिक्त शुल्क लादण्याची धमकी देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या अमेरिकी प्रशासनाने आता भारतालाच समुद्रात थांबलेल्या मोठ्या प्रमाणातील रशियन कच्च्या तेलाचा साठा खरेदी करण्याची विनंती केली आहे.

अमेरिकी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्या सुमारे १० कोटी बॅरलपेक्षा अधिक रशियन कच्चे तेल टँकरमध्ये भरून समुद्रात उभे आहे आणि ते चीन मधील रिफायनरींमध्ये अनलोडिंग स्लॉट मिळण्याची वाट पाहत आहे. अमेरिकेचे ऊर्जा सचिव क्रिस राइट यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांनी आणि अमेरिकी ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी या विषयावर भारतीय अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधला आहे. त्यांच्या मते, जर भारताने हे कार्गो खरेदी केले तर जागतिक बाजारात वाढणाऱ्या तेलाच्या किमतींवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल. अमेरिकेच्या युद्धामुळे वाढलेल्या तेलदरांबाबत निर्माण झालेली चिंता देखील कमी होऊ शकते.

क्रिस राइट यांच्या म्हणण्यानुसार, अनेक टँकर गेल्या काही आठवड्यांपासून समुद्रात थांबले आहेत. कारण चिनी रिफायनरींमध्ये तेल उतरवण्यासाठी मोठी रांग लागली असून त्यासाठी सहा आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. अशा परिस्थितीत हे कार्गो भारतीय रिफायनरींकडे वळवले तर तातडीने दिलासा मिळू शकतो आणि बाजारातील घबराट कमी होऊ शकते.

भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल आयातदार आहे. २०२२ मध्ये रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने सवलतीच्या दरात रशियन तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. २०२५ मध्ये भारताच्या तेल आयातीत सुमारे ४० टक्के हिस्सा रशियन तेलाचा होता. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सारख्या कंपन्यांच्या रिफायनऱ्या मोठ्या प्रमाणावर रशियन कच्चे तेल प्रक्रिया करू शकतात. यापूर्वीही अमेरिका सतत भारतावर रशियन तेल खरेदीबाबत दबाव टाकत आली आहे आणि त्यासाठी ट्रम्प प्रशासनाने अतिरिक्त कर लावण्याची भूमिका घेतली होती. मात्र भारताने स्वतःच्या ऊर्जा गरजा आणि किफायतशीर पुरवठ्याच्या धोरणानुसार रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली आहे.

'पाकिस्तानचे मासिक तेल आयात बिल $६०० दशलक्ष पर्यंत वाढू शकते'

'भारतीय ग्राहकांचे हित हे सरकारचे प्राधान्य'

१४ वर्षांनंतर बेपत्ता हिंदू मुलीची सुटका; मुन्ना अन्सारीवर अपहरण, धर्मांतर, बलात्काराचा आरोप

उस्मान हादी हत्येतील दोन आरोपींना पश्चिम बंगालमधून अटक

दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात वाढलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर दबाव वाढला आहे. जगातील सुमारे २० टक्के तेल वाहतुकीचा मार्ग या सामुद्रधुनीतून जातो. अलीकडील तणावामुळे टँकरची वाहतूकही सामान्यपेक्षा कमी झाली आहे. ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, भारताने समुद्रात थांबलेले हे रशियन तेल खरेदी केल्यास स्पॉट मार्केटमधील मागणी कमी होईल आणि आंतरराष्ट्रीय किमतींना काहीसा दिलासा मिळू शकतो. अंदाजानुसार, यामुळे जागतिक बेंचमार्क तेलदर प्रति बॅरल २ ते ३ डॉलरने कमी होऊ शकतात.

भारताकडून या प्रस्तावावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र यापूर्वीही संकटाच्या काळात नवी दिल्लीने अतिरिक्त रशियन तेल खरेदी करण्याबाबत लवचिकता दाखवली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनीही यापूर्वी स्पष्ट केले आहे की ऊर्जा सुरक्षा आणि परवडणारा पुरवठा हे भारतासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka