Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दक्षिण आफ्रिकेचा पराभव, न्यूझीलंडचा जलवा!

दक्षिण आफ्रिकेचा पराभव, न्यूझीलंडचा जलवा!

NEWS डंका 3 months ago

दक्षिण आफ्रिकेला 8 विकेटने हरवत मालिकेत 2-1 आघाडी

न्यूझीलंडने तिसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ८ विकेटने दणदणीत विजय मिळवत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. ईडन पार्कवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात १३७ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने केवळ १६.२ षटकांत २ विकेट्स गमावून सहज गाठले.

१३७ धावांच्या पाठलागात न्यूझीलंडची सुरुवात भक्कम झाली. डेवोन कॉनवे आणि टॉम लॅथम यांनी पहिल्या विकेटसाठी ११ षटकांत ९६ धावांची भागीदारी रचली. कॉनवेने २६ चेंडूत ३९ धावा करत संघाला मजबूत पाया दिला. त्यानंतर लॅथमने टिम रॉबिन्सनसोबत ४० धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. रॉबिन्सन १७ धावांवर बाद झाला, पण टॉम लॅथम ५५ चेंडूत नाबाद ६३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव ९ विकेट्सवर १३६ धावांवर थांबला. संघाचा वरचा क्रम पूर्णपणे अपयशी ठरला. एन. मोकुएना याने २० चेंडूत २६ धावा करत संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तर जॉर्ज लिंडेने २३ धावांचे योगदान दिले.

न्यूझीलंडकडून काइल जेमिसन, मिचेल सॅन्टनर आणि बेंजामिन सिअर्स यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर लॉकी फर्ग्युसन, कोल मॅककॉन्ची आणि जेम्स नीशम यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. ४ षटकांत ९ धावा देत १ विकेट घेणाऱ्या लॉकी फर्ग्युसनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka