Dailyhunt
धर्माचार्य ब्रह्मचारी श्री विश्वनाथजी महाराज यांचा जन्मशताब्दी वर्ष महोत्सव

धर्माचार्य ब्रह्मचारी श्री विश्वनाथजी महाराज यांचा जन्मशताब्दी वर्ष महोत्सव

NEWS डंका 1 month ago

भारतानंद सरस्वती यांचे व्याख्यान

र्माचार्य ब्रह्मचारी श्री विश्वनाथजी महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्ष महोत्सवाचा प्रारंभ ८ मार्चला होत असून मसुराश्रम, पांडुरंगवाडी, पांडुरंगवाडी मैदान, गोरेगाव येथे हा महोत्सव होणार आहे.

सायंकाळी ५.३० वाजता महोत्सवाला प्रारंभ होईल.

अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्रचे महासचिव स्वामी श्री भारतानंद सरस्वती जी महाराज यांचे यानिमित्त व्याख्यान होणार आहे.

ब्रह्मचारी श्री विश्वनाथजी गुरुजी - तपश्चर्येचे तेजस्वी व्यक्तिमत्त्व

ब्रह्मचारी श्री विश्वनाथजी गुरुजी यांच्या व्यक्तिमत्त्वात साधेपणा, संयम आणि निस्सीम सेवाभाव यांचा अद्भुत संगम दिसून येतो. त्यांचे जीवन हे केवळ आध्यात्मिक साधनेपुरते मर्यादित नव्हते, तर समाजाच्या नैतिक व आध्यात्मिक उन्नतीसाठी अखंड समर्पित होते.

मसुराश्रम त्यांच्या दृष्टीने केवळ उपासनेचे स्थान नव्हते; तो एक संस्कारकेंद्र होता — जिथे धर्म, सदाचार आणि राष्ट्रनिष्ठेची बीजे रोवली जात होती. त्यांनी केलेले कार्य कोणत्याही एका पंथापुरते सीमित नव्हते. सर्व समाजघटकांना धर्म, संस्कार आणि कर्तव्यनिष्ठ जीवनाचा संदेश देणे हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते.

त्यांच्या प्रत्येक शब्दात समाजप्रबोधनाची ज्वाला होती आणि प्रत्येक आचरणात राष्ट्रभक्तीची ठाम छाप होती. लोक त्यांना फक्त गुरु म्हणून नव्हे, तर मार्गदर्शक, आधारवड आणि पालकवत व्यक्ती म्हणून मान देत.

आज मसुराश्रम ज्या उंचीवर उभा आहे, ती त्यांच्या दूरदृष्टी, त्याग आणि कठोर तपश्चर्येची साक्ष आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य युवक धर्ममार्गी झाले, संस्कारित झाले आणि समाजकार्याच्या दिशेने प्रेरित झाले. आपल्या धर्मातून परधर्मात गेलेल्यांना सन्मानाने, विधिपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने पुन्हा हिंदू धर्मात स्वीकारणे — यालाच 'शुद्धीकरण' असे म्हणतात.

हे कार्य केवळ एक विधी नसून, तो आहे आपल्या मूळ संस्कृतीशी पुन्हा नाते जोडण्याचा पवित्र सेतू.

मोदींचा पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक': शाहपूर कंडी धरण प्रकल्प

होर्मुझ सामुद्रधुनी: जगाच्या ऊर्जा पुरवठ्याची जीवनरेखा

राष्ट्रपती मुर्मू यांच्या स्वागताला ममता गैरहजर, मोदींची टीका

'सरकारने काय करावे हे बाहेरून सांगणे सोपे, पण परिणामांचा सरकार विचार करते'

त्यांचे जन्मशताब्दी वर्ष हे केवळ स्मरणाचा सोहळा नाही; तो त्यांच्या विचारांचे पुनरुज्जीवन करण्याचा आणि त्यांच्या कार्याची नव्याने ज्योत पेटविण्याचा संकल्प आहे.
ज्यांनी आयुष्यभर स्वतःला जाळून समाजाला प्रकाश दिला, त्या तपस्वी ब्रह्मचारी श्री विश्वनाथजी गुरुजींना जन्मशताब्दी वर्षी कोटी कोटी प्रणाम.

धर्म म्हणजे केवळ ओळख नाही… तो आहे आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि आत्मसन्मानाचा श्वास.

गेली शंभर वर्षे हे पवित्र आणि समाजहिताचे कार्य मसुराश्रम सातत्याने, निष्ठेने आणि धर्माभिमानाने करत आहे.

आज अनेकांना शुद्धीकरण म्हणजे नेमके काय?
त्याची प्रक्रिया कशी असते?
शास्त्राधार काय आहे?
याविषयी अचूक आणि सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे का?

तर मग अवश्य भेट द्या आणि सत्य जाणून घ्या.
आपल्या परंपरेचा अभिमान जागवणाऱ्या या कार्याची माहिती प्रत्यक्ष मिळवा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka