Dailyhunt
'धुरंधरमध्ये स्फोट लियारीत, पण धूर वांद्रे-जुहूत'

'धुरंधरमध्ये स्फोट लियारीत, पण धूर वांद्रे-जुहूत'

NEWS डंका 3 weeks ago

झाकीर खान याचा बॉलिवूडवर सणसणीत टोला

दित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग याची मुख्य भूमिका असलेल्या 'धुरंधर' फ्रँचायझी केवळ बॉक्स ऑफिसचे विक्रमच मोडत नाहीये, तर सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनली आहे.

चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू असतानाच, विनोदी कलाकार झाकीर खान याने बॉलिवूडवर टीका केली आहे. या चित्रपटाच्या प्रचंड यशामुळे बॉलिवूडमधील अनेकांना मत्सर वाटू लागला आहे, असे त्याने विधान केले आहे.

रविवारी, झाकीर याने आलिया भट्ट आणि करण जोहर यांच्यासोबत चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६ च्या मंचावर सूत्रसंचालक म्हणून जबाबदारी पार पाडली. आता, या सोहळ्यातील अनेक क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या असून त्यापैकी एका क्लिपने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. ती क्लिप म्हणजे 'धुरंधर' फ्रँचायझीच्या ब्लॉकबस्टर यशावरून झाकीरने बॉलिवूडवर मारलेला खोचक टोला. मूळ चित्रपट आणि त्याचा सिक्वेल दोन्ही बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरले असून, ते मोठे व्यावसायिक हिट ठरले आहेत.

'तुम्ही कितीही बोला, अभिनंदनच्या पोस्ट टाका की 'धुरंधर' हा सिनेमा आमचा आवडता आहे, पण सत्य हे आहे की, 'धुरंधर'मुळे मत्सर वाटू लागला आहे. चित्रपटात लियारीमध्ये बॉम्बस्फोट झाले, पण त्याचा धुर वांद्रे आणि जुहू दरम्यान निघाला आहे,' असा खोचक टोला झाकीर खान याने बॉलीवूडला लगावला आहे. या क्लिपला सोशल मीडियावर खूप प्रसिद्धी मिळत आहे. 'झाकीर खान सत्य बोलत आहेत,' असे एकाने म्हटले. तर आणखी एकाने लिहिले आहे की, धुरंधर चित्रपटामुळे ज्या मुंबईकरांचा विश्वासघात झाला, त्यांना झाकीर खान केवळ उघडं पाडत आहेत.

'कराराची मंगळवारची मुदत चुकल्यास सर्व उध्वस्त करणार!'

इसिस संघटनेशी संबंधित दोन संशयिताना ठाणे, कुर्ल्यातून अटक

कर्णधार दमदार; लखनऊ सुपर जायंट्सचा हैदराबादवर मोठा विजय

जेवणानंतर गोड खाण्याची सवय का लागते? शरीर देतंय महत्त्वाचा इशारा

या चित्रपट मालिकेचा पहिला भाग डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झाला आणि जगभरात १३०० कोटींहून अधिक कमाई करून ब्लॉकबस्टर ठरला. 'धुरंधर द रिव्हेंज' या दुसऱ्या भागाला १४५ कोटी रुपयांची दमदार ओपनिंग मिळाली आणि आतापर्यंत त्याने जागतिक स्तरावर १५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. किंबहुना, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर १००० कोटी रुपयांची निव्वळ कमाई करणारा 'धुरंधर २' हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय थ्रिलरमध्ये रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, राकेश बेदी, आर. माधवन आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka