Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दिल्लीत १६ ऑगस्टपर्यंत 'नो-ड्रोन झोन'

दिल्लीत १६ ऑगस्टपर्यंत 'नो-ड्रोन झोन'

NEWS डंका 3 weeks ago

स्वातंत्र्यदिनापूर्वी राजधानीत हाय अलर्ट

स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राजधानीत २ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान ड्रोनसह सर्व प्रकारच्या लहान हवाई उपकरणांच्या उड्डाणावर पूर्णपणे बंदी घातली आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत दिल्ली पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी हा आदेश जारी केला आहे. हा आदेश १५ दिवसांसाठी लागू राहणार असून, त्यामध्ये १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यापूर्वीचा आणि त्यानंतरचा कालावधी समाविष्ट आहे.

दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, काही गुन्हेगारी, समाजविघातक किंवा दहशतवादी घटक ड्रोन आणि इतर लहान हवाई उपकरणांचा वापर करून सर्वसामान्य नागरिक, मान्यवर व्यक्ती तसेच महत्त्वाच्या सरकारी आस्थापनांच्या सुरक्षेला धोका निर्माण करू शकतात, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे.

गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार, समाजविघातक किंवा दहशतवादी घटक ड्रोन आणि इतर लहान हवाई साधनांचा वापर करून सामान्य नागरिक, व्हीआयपी, संवेदनशील सरकारी इमारती आणि स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू शकतात. संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही बंदी लागू करण्यात आली आहे.

दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (NCT) अधिसूचित कालावधीत कोणालाही पॅराग्लायडर, पॅरामोटर, हँगग्लायडर, मानवरहित हवाई वाहन (UAV), मानवरहित हवाई प्रणाली (UAS), मायक्रोलाइट विमान, रिमोट कंट्रोल विमान, हॉट एअर बलून, लहान आकाराची उड्डाण करणारी साधने, क्वाडकॉप्टर तसेच विमानातून पॅराजंपिंग करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

पप्पू यादवना संसद परिसरातील 'नाटक' भोवले

पीओकेतील हिंसाचारावर ब्रिटनमध्येही संताप; तातडीने हस्तक्षेप करा!

मेलोनी यांनी इटली प्रवेशास स्थलांतरिताना केली बंदी

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या

दिल्ली पोलिसांनी या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. ३१ जुलै रोजी हा आदेश जारी करण्यात आला असून, तो २ ऑगस्टपासून लागू होणार आहे. १६ ऑगस्टपर्यंत (दोन्ही दिवसांसह) हा आदेश प्रभावी राहणार असून, त्यानंतर किंवा आदेश मागे घेईपर्यंत हे निर्बंध कायम राहतील.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka