Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दिपकेला प्रतिबंधात्मक अटक; नेहा बोराची सुटका

दिपकेला प्रतिबंधात्मक अटक; नेहा बोराची सुटका

दिल्ली पोलिसांची कारवाई

कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके याला शांतता भंग होण्याची शक्यता आणि शांतता राखण्याच्या हमीपत्राशी संबंधित कारवाईअंतर्गत दिल्ली पोलिसांनी प्रतिबंधात्मक अटक केली आहे.

दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या (AISA) अध्यक्षा नेहा बोरा हिची शनिवारी सकाळी सुटका करण्यात आली. शुक्रवारी, १६ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे नियोजित 'लेहरा दो तिरंगा' मोर्चापूर्वी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले होते.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा बोरा हिची दिल्ली पोलीस कायद्याच्या कलम ६५ अंतर्गत आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुटका करण्यात आली. दुसरीकडे, अभिजीत दिपके याच्याविरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १२६ आणि १७० अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर (SEM) हजर केले जाणार आहे.

अभिजीत दिपके याच्या अटकेनंतर त्यांच्या ठावठिकाणाबाबत सीजेपीने प्रश्न उपस्थित केले होते. पक्षाच्या कायदेशीर प्रतिनिधींनी दिपके यांना कुठे ठेवण्यात आले आहे, त्यांच्याविरोधात कोणत्या कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे आणि वकिलांना त्यांची भेट घेता येणार आहे का, याबाबत माहिती मागितली होती. नेहा बोरा हिला ताब्यात घेतल्यानंतर तिला अनेक ठिकाणी हलवण्यात आल्याचा आणि सुरुवातीला वकिलांना भेटू दिले नसल्याचा आरोप AISA ने केला होता.

भारतापुढे दबाव फोल; ट्रम्प यांची शुल्कवाढीवरून माघार

महाराष्ट्रात सुट्ट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी

कोमलचा कांस्यवेध; अमृता सुवर्णपदकाच्या उंबरठ्यावर!

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

दरम्यान, कॅनॉट प्लेस परिसरात मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. सेंट्रल पार्क परिसराला सुरक्षा दलांनी घेराव घातला होता, तर रॅपिड ॲक्शन फोर्ससह अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच वाहतुकीचा सुरळीत प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी सुमारे १५० जणांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. सीजेपी आणि संबंधित संघटनांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर 'लेहरा दो तिरंगा' मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पोलिसांच्या कारवाईमुळे मोर्चा नियोजित पद्धतीने पार पडू शकला नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka