Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दिवाळीनंतर युपीआय व्यवहारांवर शुल्क

दिवाळीनंतर युपीआय व्यवहारांवर शुल्क

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून घोषणा

युपीआयद्वारे केल्या जाणाऱ्या निवडक व्यापारी व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) लागू करण्याचा निर्णय दिवाळीनंतरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने मंगळवारी, १३ ऑक्टोबर रोजी याबाबत घोषणा केली. सणासुदीच्या काळात व्यापारी आणि ग्राहकांना अडचणी येऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शुल्क लागू होण्याची नेमकी तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.

प्रसिद्धीपत्रकानुसार, युपीआय आणि सेवा सुकाणू समितीने निवडक व्यक्ती-ते-व्यापारी (P2M) व्यवहारांवर दिवाळीनंतर लगेच एमडीआर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी हे शुल्क १५ ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता होती. मात्र, व्यापारी संघटना, फिनटेक कंपन्या आणि पेमेंट कंपन्यांनी अंमलबजावणी पुढे ढकलण्याची विनंती केली होती.

प्रस्तावित आराखड्यानुसार, २,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या निवडक युपीआय व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर आकारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, १०,००० रुपयांच्या पात्र व्यवहारावर ४० रुपये शुल्क लागू होईल. मात्र, हे शुल्क सर्व युपीआय व्यवहारांवर लागू होणार नाही. एमडीआर म्हणजे डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी व्यापाऱ्यांकडून आकारले जाणारे शुल्क.

लष्करच्या वरिष्ठ कमांडरसह चार पाक दहशतवादी भूसुरुंगाच्या स्फोटात ठार

'हिंदूंच्याच दुकानातून बिर्याणी खरेदी करा' बंगालमध्ये लागले पोस्टर

जयशंकर यांचा इशारा शेतकऱ्यांची कसोटी |

पॉवेल, रदरफोर्डवर आयसीसीचा बडगा!

दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये खरेदी-विक्री वाढते. किरकोळ विक्रेते, ऑनलाइन विक्रेते आणि पेमेंट सेवा पुरवठादारांसाठी हा महत्त्वाचा काळ असतो. अशा वेळी नव्या शुल्कामुळे व्यवहारांबाबत संभ्रम निर्माण होऊ नये, तसेच व्यापाऱ्यांना आवश्यक तयारीसाठी वेळ मिळावा, यासाठी अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, १३ ऑक्टोबरच्या प्रसिद्धीपत्रकात शुल्क लागू करण्याची निश्चित तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे दिवाळीनंतर नेमक्या कोणत्या दिवसापासून हा नियम लागू होणार आणि कोणत्या व्यापारी व्यवहारांचा त्यात समावेश असेल, याकडे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka