Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
डॉलरची घसरण अन् मौल्यवान धातूंना बूस्ट

डॉलरची घसरण अन् मौल्यवान धातूंना बूस्ट

NEWS डंका 2 weeks ago

सोन्या-चांदीच्या दरात तेजी

जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतीय कमोडिटी बाजारावर दिसून येत आहे. अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्याने सोमवारी (३ ऑगस्ट) सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली.

गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे वाढल्याने दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये जवळपास एक टक्क्यापर्यंत वाढ झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर ५ ऑगस्ट २०२६ रोजी मुदत पूर्ण होणारा सोन्याचा करार मागील बंद भाव १,४१,५११ रुपये प्रति १० ग्रॅम वरून वाढीसह १,४२,००२ रुपये प्रति १० ग्रॅम वर खुला झाला.

सकाळी १०.२० वाजता सोने ४०३ रुपयांनी म्हणजेच ०.२८ टक्क्यांनी वाढून १,४१,९१४ रुपये प्रति १० ग्रॅम वर व्यवहार करत होते. दिवसभरातील व्यवहारात सोन्याने आतापर्यंत १,४१,५५० रुपयांचा नीचांकी, तर १,४२,००२ रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला. चांदीच्या दरातही जोरदार वाढ दिसून आली. एमसीएक्सवरील ४ सप्टेंबर २०२६ चा चांदीचा करार मागील बंद भाव २,१७,१९८ रुपये प्रति किलो वरून वाढून २,१७,९९५ रुपये प्रति किलो वर खुला झाला. व्यवहारादरम्यान चांदी २,१४९ रुपयांनी म्हणजेच ०.९९ टक्क्यांनी वाढून २,१९,३४७ रुपये प्रति किलो वर पोहोचली. चांदीने आतापर्यंत २,१७,६८३ रुपयांचा नीचांकी, तर २,१९,३९९ रुपयांचा उच्चांकी स्तर नोंदवला.

जागतिक बाजारातही सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये तेजी कायम आहे. कॉमेक्स बाजारात सोने ०.३२ टक्क्यांनी वाढून ४,१२० डॉलर प्रति औंस, तर चांदी १.२४ टक्क्यांनी वधारून ५८.५१ डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत होती. तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीच्या दरातील वाढीमागे अमेरिकन डॉलरमधील कमजोरी हे प्रमुख कारण आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबण्याच्या संकेतांनंतर कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या. त्यामुळे डॉलरची मागणी कमी झाली असून डॉलर निर्देशांकावर दबाव निर्माण झाला आहे.

चिन्मय कृष्ण दास यांना दोन प्रकरणांत जामीन; तुरुंगातून सुटकेची शक्यता नाही

'आप'च्या माजी आमदारांचा मकोका प्रकरणात जामीन फेटाळला

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण सिंह निर्दोष

पाकिस्तानात रॅलीवर आत्मघाती हल्ला

डॉलर निर्देशांक हा जगातील प्रमुख सहा चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची ताकद दर्शवतो. यात युरो, जपानी येन, पाउंड स्टर्लिंग, कॅनेडियन डॉलर, स्वीडिश क्रोना आणि स्विस फ्रँक यांचा समावेश होतो. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमतींमध्येही घसरण सुरूच आहे. वृत्त लिहिताना ब्रेंट क्रूड ५.३६ टक्क्यांनी घसरून ८३.२० डॉलर प्रति बॅरल, तर डब्ल्यूटीआय क्रूड ६.१८ टक्क्यांच्या घसरणीसह ७९.०६ डॉलर प्रति बॅरल वर व्यवहार करत होते. जागतिक अनिश्चितता, डॉलरमधील चढ-उतार आणि सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी यामुळे आगामी काळात सोने आणि चांदीच्या दरांवर बाजाराची नजर राहणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka