Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
डोंबिवलीत लोकलच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू

डोंबिवलीत लोकलच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू

शवविच्छेदन अहवालाने उघड केलं धक्कादायक सत्य

डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेने सुरुवातीला अपघाताचे स्वरूप दिसत असतानाच तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

२ ऑगस्ट रोजी कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली होती. मात्र, पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून आत्महत्येचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालातून मृत मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

घटनेनंतर डोंबिवली रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासादरम्यान पोलिसांनी मृत मुलीचा मोबाईल तपासला असता तिच्या चॅटिंगमधून एका तरुणासोबतच्या संबंधांची माहिती समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिची डोंबिवलीतील राज पकड या तरुणाशी ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमसंबंधात रूपांतर झाले.

विमल जाहिरातीवर एफडीएचा दणका; शाहरुख, अजय, टायगरला नोटीस

आपण भ्रष्टाचार केला नाही म्हणत तृणमूल नेत्याची आत्महत्या

पारशी कॅफेंमध्ये जपला जातोय जुन्या चवींचा वारसा

मोबाईलमधील संभाषण आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी राज पकड याची चौकशी केली. तपासात मिळालेल्या महत्त्वाच्या धाग्यांनंतर त्याला अटक करण्यात आली. आरोपीला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज हा खासगी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणातील सर्व बाबींचा सखोल तपास डोंबिवली रेल्वे पोलीस करत असून, मुलीने आत्महत्येचा निर्णय का घेतला, तिच्या गर्भधारणेची पार्श्वभूमी काय होती आणि या प्रकरणात आणखी कोणाची भूमिका आहे का, याचा तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि मोबाईलमधील संभाषणामुळे या प्रकरणातील अनेक प्रश्न ऐरणीवर आले असून, तपासातून पुढे आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka