Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दोन टाकी चौकीतूनच चोरले पोलिसांचे वॉकी-टॉकी

दोन टाकी चौकीतूनच चोरले पोलिसांचे वॉकी-टॉकी

NEWS डंका 1 month ago

व्ही. पी. रोड पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू;

व्ही. पी. रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन टाकी चौकीत चार्जिंगला लावलेले मुंबई पोलिसांचे वॉकी-टॉकी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकारामुळे पोलिस चौकीच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन टाकी चौकीमध्ये पोलिसांचे वॉकी-टॉकी चार्जिंगसाठी ठेवण्यात आले होते. ते चार्जरला जोडलेले असतानाच अज्ञात व्यक्तीने ते लंपास केले. प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी परिसरातील माहिती घेत चोरीला गेलेल्या वॉकी-टॉकीचा तसेच ते घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणी व्ही. पी. रोड पोलिसांकडून चौकशी सुरू असून, संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चोरीला गेलेले वॉकी-टॉकी पोलिसांच्या दैनंदिन कामकाजासाठी वापरले जात असल्याने त्याच्या चोरीची पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka