Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
डुप्लिकेट चावीने महागड्या गाड्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

डुप्लिकेट चावीने महागड्या गाड्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बेंगळुरू पोलिसांची कारवाई

बेंगळुरू पोलिसांनी लक्झरी कार चोरीच्या एका मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश करत एका महिलेसह दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी महागड्या कार डुप्लिकेट चावी आणि अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने चोरत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

चोरी केलेल्या कार राजस्थानमध्ये विकल्या जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात ३५ लाख रुपये किमतीची टोयोटा फॉर्च्युनर राजस्थानातून जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणाची सुरुवात २७ जून रोजी झाली. चेन्नईतील एक व्यक्ती वीकेंड ट्रिपसाठी बेंगळुरूला आला होता. रात्री चित्रपट पाहून सुमारे दीड वाजता तो हॉटेलमध्ये परतला आणि त्याने आपली टोयोटा फॉर्च्युनर हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभी केली. मात्र, सकाळी पार्किंगमध्ये गेल्यानंतर त्याला कार जागेवर दिसली नाही. त्यानंतर त्याने परप्पना अग्रहारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढला. ४ जुलै रोजी बेलगावी-पुणे महामार्गावरील कराडजवळ पोलिसांनी त्यांना ट्रेस केले. त्यावेळी मुख्य आरोपी चोरीची कार घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला; मात्र त्याच्या महिला साथीदाराला पोलिसांनी पकडले. चौकशीत तिने दोघेही महागड्या कार चोरी करून त्यातून झटपट पैसे कमावत असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर विशेष पथकाने १७ जुलै रोजी सिल्क बोर्डजवळ मुख्य आरोपीला अटक केली.

होर्मुझमधून तेल नेण्यासाठी अमेरिकेने उघडला 'गुप्त मार्ग'?

पाकला 'जशास तसं' दणका; उच्चायोगाबाहेरील बॅरिकेड्स हटवले

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या 'आयपीओ'ला सेबीचा ग्रीन सिग्नल!

सकाळी १० वाजले तरी ऑफिस रिकामं! बंगळुरूच्या ट्रॅफिकला कंपन्या हैराण

पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने लक्झरी कारच्या चाव्यांचे डुप्लिकेट तयार करत होता. त्यानंतर त्या चावीच्या साहाय्याने कार अनलॉक करून त्या लंपास केल्या जात होत्या. चोरीच्या कार राजस्थानमधील बाडमेर, बालोत्रा आणि आसपासच्या भागातील परिचितांना विकल्या जात असल्याचे तपासात समोर आले. अखेर पोलिसांनी २४ जुलै रोजी राजस्थानमधील अलेटी परिसरातून चोरीची टोयोटा फॉर्च्युनर जप्त केली. या कारची किंमत सुमारे ३५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासात आरोपींचा गुन्हेगारी इतिहासही समोर आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींचा बेंगळुरू, हैदराबाद, राजस्थान आणि तमिळनाडूमधील तब्बल २१ प्रकरणांशी संबंध असल्याचे आढळले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka