Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एअर इंडियाच्या फुकेत-दिल्ली विमानावरील नियंत्रण ४ सेकंदांसाठी सुटले होते!

एअर इंडियाच्या फुकेत-दिल्ली विमानावरील नियंत्रण ४ सेकंदांसाठी सुटले होते!

एअरबसच्या तपासात धक्कादायक माहिती

फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ४ ऑगस्ट रोजी अचानक सुमारे ३०० फूट खाली आलेल्या एअर इंडिया ए३२० विमानावरील नियंत्रण तब्बल चार सेकंदांसाठी सुटले होते, अशी एअरबसच्या प्राथमिक तपासातून माहिती समोर आली आहे.

या काळात विमानाच्या महत्त्वाच्या फ्लाइट-कंट्रोल सिस्टीमने काम करणे बंद केले होते.

एअर इंडियाचे एआय२३७९ हे विमान फुकेतहून दिल्लीच्या दिशेने येत होते. विमानाने सुमारे ३०० फूट उंची गमावल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेत २४ प्रवासी आणि क्रू सदस्य जखमी झाले होते. मात्र, विमानाने नंतर नियंत्रण मिळवत दिल्ली विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले.

एअरबसच्या प्राथमिक तांत्रिक आकलनानुसार, विमानाच्या तिन्ही हायड्रॉलिक सिस्टीममध्ये अल्पावधीत समस्या निर्माण झाली. त्यामुळे विमानाच्या वर-खाली हालचाली नियंत्रित करणारे एलिव्हेटर आणि डावीकडे-उजवीकडे हालचाल नियंत्रित करणारे एलेरॉन्स सुमारे चार सेकंद प्रभावीपणे काम करू शकले नाहीत. या काळात विमानाच्या नियंत्रणावर परिणाम झाल्याने वैमानिकांना परिस्थिती हाताळण्यासाठी अत्यंत कमी वेळ मिळाला. एअरबसच्या प्राथमिक तपासात ही तांत्रिक बिघाडाची घटना गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विमानाची नाकाची दिशा खाली करण्यासाठी फर्स्ट ऑफिसरने पूर्ण नोज-डाउन इनपुट दिला. मात्र, फ्लाइट-कंट्रोल सिस्टीम प्रतिसाद देत नसल्याने या इनपुटचा तात्काळ परिणाम झाला नाही. काही सेकंदांनंतर हायड्रॉलिक सिस्टीम आणि फ्लाइट-कंट्रोल कॉम्प्युटर्स पुन्हा कार्यरत झाल्यानंतर विमानाने वैमानिकांच्या आदेशांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली.

दुबईत लपलेला ड्रग्ज किंगपिन वीरेंद्र सिंग बसोया भारताच्या ताब्यात

टॅरिफ चुकवण्यासाठी चीनकडून भारताचा वापर? ४० देशांवर अमेरिकेचा आरोप

'टिप द्या, राइड मिळवा'चा फंडा बंद; केंद्राचा उबर-ओलासह सर्व ऍप्सना आदेश

उत्तराखंडच्या चमोलीत जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दुर्घटना; ७ कामगारांचा मृत्यू

एअरबसने आपल्या प्राथमिक अहवालात हायड्रॉलिक सिस्टीममध्ये अनुक्रमे बिघाड झाल्याचे नमूद केले आहे. मात्र, तिन्ही हायड्रॉलिक सिस्टीममध्ये एकाच वेळी समस्या नेमकी कशामुळे निर्माण झाली, याचे अंतिम कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे विमानाच्या देखभाल नोंदी, तांत्रिक माहिती आणि इतर डेटाची पुढील तपासणी केली जाणार आहे. या घटनेची चौकशी Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) करत आहे. एअरबस आणि फ्रान्सची BEA देखील तपासात तांत्रिक मदत करत आहेत. विमानाच्या फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधील माहितीच्या आधारे घटनेची अधिक तपशीलवार चौकशी सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka