Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एझिमला नौदल अकादमीतून बांगलादेशी नागरिकाला अटक

एझिमला नौदल अकादमीतून बांगलादेशी नागरिकाला अटक

NEWS डंका 1 month ago

बनावट कागदपत्रांच्या आधारे वर्षभर करत होता नोकरी

केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील पाय्यानूरजवळील एझिमला येथील भारतीय नौदल अकादमीत बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. भारतीय नागरिक असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे हा व्यक्ती नौदल अकादमीत सुमारे वर्षभर काम करत असल्याचे समोर आले आहे.

या घटनेनंतर अकादमीच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव बिप्लब सोरेन (३२) असल्याचे उघडकीस आले आहे. तो एझिमला येथील भारतीय नौदल अकादमीच्या लॉन्ड्री विभागात तात्पुरता कर्मचारी म्हणून काम करत होता. त्याच्याकडे 'बिप्लब सोरेन' या नावाने तयार करण्यात आलेले बनावट आधार कार्ड तसेच पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद पोलिसांच्या नावाने तयार करण्यात आलेले बनावट पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र असल्याचे तपासात समोर आले आहे.

अधिकाऱ्यांना त्याच्या वर्तनाबाबत संशय आल्याने त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले. त्यानंतर नौदल अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. त्याच्या मोबाइल फोनमध्ये बांगलादेशी नागरिकत्वाशी संबंधित कागदपत्रे आढळल्यानंतर त्याची खरी ओळख समोर आली. त्यानंतर त्याला पय्यन्नूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून बिप्लब सोरेन हे त्याचे खरे नाव आहे का, त्याला अकादमीत नोकरी कशी मिळाली आणि बनावट कागदपत्रे त्याने कुठून मिळवली, याचा तपास केला जात आहे. त्याच्या नौदल अकादमीतील कामाचे नेमके स्वरूप काय होते, याबाबतही अधिकाऱ्यांनी अद्याप तपशील जाहीर केलेला नाही.

अजित आगरकरना मुदतवाढ की नवे निवडसमिती प्रमुख?

तीन बड्या वृत्तसंस्थांना व्हाईट हाऊसचे दरवाजे बंद!

ग्रीनलँडच्या सुरक्षेवर अमेरिकेचे 'कायमस्वरूपी नियंत्रण'!

परीक्षेत चॅटजीपीटी वापरताना पकडल्यानंतर विद्यार्थ्याची आत्महत्या

दरम्यान, कन्नूरमध्ये गेल्या काही दिवसांत बांगलादेशी नागरिकांशी संबंधित आणखी काही प्रकरणे समोर आली आहेत. यापूर्वी कन्नूरमधील स्पामध्ये काम करणाऱ्या पाच बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडे वैध कागदपत्रे नसल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये परदेशी नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी अधिक व्यापक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka