Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ऍक्सिस बँकेतही लव्ह जिहादसारख्या घटना.अमृता फडणवीस यांचा दावा

ऍक्सिस बँकेतही लव्ह जिहादसारख्या घटना.अमृता फडणवीस यांचा दावा

NEWS डंका 1 month ago

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

नाशिकमधील टीसीएस (TCS) बीपीओ सेंटरमध्ये महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, जबरदस्तीने धर्मांतर आणि ब्लॅकमेलिंगचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

यानंतर राज्यासह देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काही वरिष्ठ टीम लीडर्ससह अनेक संशयित असून, नऊहून अधिक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या ऍक्सिस बँकेत सेवा देत असताना त्यांच्यासमोर अशी प्रकरणे झाली होती, पण वरिष्ठांनी तात्काळ अशा प्रकरणात कारवाई केली होती, असं अमृता फडणवीस यांनी सांगितले.

अमृता फडणवीस यांनी नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'मला खूपच खराब वाटत आहे आणि खेद आहे की, कॉर्पोरेट्समध्ये अशाप्रकारच्या घटना होत आहेत. माझ्याही वेळेस, मी जेव्हा ऍक्सिस बँकेत होती तेव्हा अशा केसेस माझ्यासमोर झालेल्या आहेत. त्यावेळी वरिष्ठांकडून त्या मुलांच्या विरोधात कारवाई झालेली आहे. मला असं वाटतं की, असं झाल्यानंतर कारवाई करणं जरुरीचं आहे. तसेच आपल्या वरिष्ठांना सांगणं जरुरीचं आहे. त्याच्यानेच हे बंद होणार,' असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.

बुधवारपर्यंत इराणसोबत करार न झाल्यास पुन्हा हल्ले!

दुहेरी नागरिकत्व प्रकरणी राहुल गांधींविरोधात एफआयआर

भारत-चीन संबंधांना नवी दिशा; SCO मंचावरून संवादाला गती

वर्ल्ड स्क्वॅशचे माजी प्रमुख नारायण रामचंद्रन यांचे निधन

पुढे त्या म्हणाल्या की, आजकाल लव जिहादची प्रकरण खूप भयानक आहेत. आता आपल्या मुलींनाही थोडं अलर्ट राहणं जरुरी आहे. आपल्या संस्कृतीचे पालन केल्यास अशा घटना घडणार नाहीत, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. लव्ह जिहादबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, आपल्या मुलींनादेखील थोडं अलर्ट राहायला सांगणं जरुरीचं आहे. आपण आपल्या संस्कृतीवर खूप प्रमाणिकपणे प्रेम केलं तर अशा घटना घडणार नाहीत. आपले तरुण सध्या संभ्रमात आहेत. त्यांना आपल्या स्वतःच्या पुराणांची आणि वेदांची माहिती नाही. त्यामुळं भारतीय संस्कृतीवर आधारित शिक्षण देणं आवश्यक असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka