Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एसबीआयच्या ३,८९७ ग्राहकांची माहिती डार्क वेबवर लीक

एसबीआयच्या ३,८९७ ग्राहकांची माहिती डार्क वेबवर लीक

मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि घराच्या पत्त्याचा समावेश

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

बँकेच्या ३,८९७ ग्राहकांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर उपलब्ध असून, या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रातील सायबर सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. डेटा लीकसंदर्भात मिळालेल्या सूचनांनंतर बँकेने या प्रकरणाची तपासणी सुरू केली आहे. प्राथमिक विश्लेषणादरम्यान डार्क वेबवरील सुमारे ३ लाख ७५ हजार नोंदींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३,८९७ नोंदींमध्ये ग्राहकांची ओळख पटवणारी माहिती आढळल्याचे वृत्त आहे.
उघड झालेल्या माहितीमध्ये ग्राहकांची नावे, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, ई-मेल पत्ते आणि निवासी पत्ते यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय काही नोंदींमध्ये ग्राहकांचे ओळखविषयक तपशील तसेच कर्ज आणि कर्ज अर्जांशी संबंधित माहितीही आहे. या माहितीचा वापर करून सायबर गुन्हेगार ग्राहकांना लक्ष्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्राहकांची खरी वैयक्तिक माहिती वापरून बँकेचे अधिकारी असल्याचे भासवणे, केवायसी अद्ययावत करण्याच्या नावाखाली गोपनीय तपशील मागणे किंवा बनावट संदेश आणि लिंक पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

टायगर प्रकरणात दादर कनेक्शन…दोन तरुणीही कटात सामील

रुबिओंसमोर २६/११ च्या प्रत्यक्ष साक्षीतून पाकिस्तानस्थित दहशतवादाचे वास्तव!

अल्पवयीन मुलीला थपडा मारणाऱ्या मोहम्मद गुर्फान शेखच्या आवळल्या मुसक्या
मिळालेल्या वृत्तानुसार, १६ ऑक्टोबर रोजी एसबीआयला संभाव्य डेटा लीकबाबत संबंधित सायबर सुरक्षा यंत्रणांकडून सूचना मिळाल्या होत्या. त्यानंतर बँकेने तपासाची प्रक्रिया सुरू केली असून, माहिती नेमकी कुठून लीक झाली, तिचे स्वरूप काय आहे आणि ग्राहकांवर त्याचा कितपत परिणाम झाला आहे, याची पडताळणी केली जात आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सीईआरटी-इनच्या मान्यताप्राप्त स्वतंत्र सायबर सुरक्षा संस्थेची मदत घेण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या घटनेमुळे बँकेच्या मुख्य कामकाजावर किंवा व्यवसायाच्या सातत्यावर कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम झालेला नसल्याचे एसबीआयने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर एसबीआयच्या ग्राहकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. बँकेच्या नावाने फोन करून खाते बंद करण्याची धमकी देणाऱ्या, केवायसीच्या नावाखाली माहिती मागणाऱ्या किंवा तातडीने लिंकवर क्लिक करण्यास सांगणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहावे. कोणत्याही परिस्थितीत ओटीपी, एटीएम पिन, इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड किंवा इतर गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये. तसेच खात्यातील व्यवहारांवर नियमित लक्ष ठेवावे आणि संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka