Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गणेश विसर्जनासाठी मुंबई सज्ज

गणेश विसर्जनासाठी मुंबई सज्ज

NEWS डंका 0 months ago

प्रशासनाकडून विशेष नियोजन

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई सज्ज झाली असून सुरक्षेसाठी शहरात २६ हजारांहून अधिक पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

यंदा सुरक्षेसाठी सीसीटीव्हीसोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. विसर्जनानंतर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी रात्रभर लोकल आणि मेट्रो सेवा सुरू ठेवण्याबाबत मुंबई पोलिसांनी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाला पत्र दिले आहे. सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोज कुमार शर्मा आणि सहपोलीस आयुक्त (वाहतूक) सत्यनारायण चौधरी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

खाकीचा कडक बंदोबस्त

सुरक्षेसाठी सहा सहपोलीस आयुक्त, ३८ उपायुक्त, ५८ सहायक आयुक्त, ३,२१३ पोलीस निरीक्षक आणि १८,९४० अंमलदार असे एकूण २६ हजार २२ पोलिस रस्त्यावर उतरतील. याशिवाय होमगार्ड, दंगल नियंत्रण पथक (आरसीपी) आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) तुकड्याही मदतीला असतील.

चौपाटीवर ५१ वॉच टॉवर, 'एआय'ची नजर

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. गिरगाव चौपाटीवर ५१ वॉच टॉवर उभारण्यात आले असून, तेथून संपूर्ण परिसरावर बारीक लक्ष ठेवले जाईल. विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी अतिरिक्त बोटी, तराफे आणि मोठ्या मूर्तींसाठी क्रेन सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यंदा मुंबईत ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळे आणि ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहतुकीचे नियोजन आणि पार्किंग

'धुरंधर'ने बदलला लडाखच्या पर्यटनाचा चेहरा

सीसीटीव्ही गायब, अहवालात क्लीनचिट; २०२३ बंगाल पंचायत निवडणुकीत गैरप्रकार

थारच्या चेसिसपासून कंबरेच्या पट्ट्यापर्यंत; ३२ कोटींचे सोने जप्त

पाकिस्तानचे अफगाणिस्तानवर ड्रोन हल्ले

लोकल-मेट्रो २४ तास चालवण्याची विनंती

भाविकांना मध्यरात्री घरी परतणे सोयीचे व्हावे म्हणून लोकल आणि मेट्रो २४ तास चालवण्याची विनंती पोलिसांनी प्रशासनाकडे केली आहे. मध्य रेल्वेने रात्री विशेष फेऱ्यांचे नियोजन केले असून, गिरगाव चौपाटीवरील गर्दीचा ताण पाहता चर्नी रोड स्थानकावरील लोकलच्या थांब्यांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka