कच्चा माल, इंधन आणि मजुरीच्या वाढत्या खर्चाचा परिणाम
१४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी संपूर्ण महाराष्ट्रात जय्यत तयारी सुरू झाली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, नागपूरसह राज्यभरातील बाजारपेठा गणेशमूर्तींनी सजल्या असून, घराघरांत बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू आहे.
मात्र, यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट दिसून येत आहे. शाडू माती, रंग, सजावटीचे साहित्य, इंधन आणि मजुरीच्या वाढलेल्या दरामुळे गणेशमूर्तींच्या किमतीत यंदा मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी शाडूच्या मूर्तींचे दर तब्बल २५ ते ३० टक्क्यांनी वाढल्याचे चित्र आहे.
राज्यातील विविध मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये सध्या मूर्तींना अंतिम रूप देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मूर्ती घडवणे, डोळ्यांची आखणी, रंगकाम आणि सजावट या कामांना वेग आला आहे. मात्र, कुशल कारागिरांची कमतरता जाणवत असल्याने मूर्तिकारांवरील कामाचा ताण वाढला आहे. वाढलेला उत्पादन खर्च आणि मर्यादित मनुष्यबळ यामुळे यंदा मूर्ती तयार करणे अधिक खर्चिक ठरत आहे.
दिपके बोस्टनमध्ये धुणीभांडी करत होता काय?
आयफोन १८ प्रोची उद्या ग्रँण्ड एन्ट्री
संयुक्त राष्ट्राच्या नव्या नकाशात अरुणाचल, अक्साई चीन स्वतंत्र प्रदेश
राज्यातील बाजारपेठांमध्ये अर्ध्या फुटापासून आठ फुटांपर्यंत विविध आकारांच्या आणि आकर्षक गणेशमूर्ती उपलब्ध झाल्या आहेत. पारंपरिक वेशभूषेतील मूर्ती, बालगणेशाच्या मूर्ती तसेच विविध आकर्षक रूपांना मोठी मागणी आहे. किमती वाढल्या असल्या तरी बाप्पाच्या स्वागतासाठी नागरिकांचा उत्साह मात्र कायम आहे.
दरम्यान, पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची विक्री काही ठिकाणी सुरू असल्याचेही दिसत आहे. शाडूच्या तुलनेत पीओपीच्या मूर्ती स्वस्त आणि हलक्या असल्याने काही ग्राहक त्यांना पसंती देत आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडूच्या मूर्तींचा वापर वाढवण्याचे आवाहन केले जात आहे.

