कोकण रेल्वेकडून मोठा दिलासा
गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या चाकरमान्यांना कोकणाची ओढ लागते. गणेशोत्सवासाठी आपापल्या गावी जाण्याची तयारी सुरू असताना अनेक प्रवाशांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळत नाही.
अशा प्रवाशांसाठी रेल्वेने दिलासा दिला आहे. दिवा आणि पनवेलहून चिपळूण आणि खेडपर्यंत तीन अनारक्षित मेमू रेल्वे सेवा चालवण्यात येणार आहेत.
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या काळात या विशेष मेमू सेवांचा चाकरमान्यांना मोठा फायदा होऊ शकतो. या गाड्यांसाठी आरक्षित तिकिटाची आवश्यकता नसल्याने कन्फर्म तिकीट न मिळालेल्या प्रवाशांना कोकण गाठण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
दिवा-चिपळूण मेमू
दिवा-खेड मेमू
पनवेल-चिपळूण मेमू

