Dailyhunt
गॅस सिलेंडर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४५ सिलेंडर आणि ३ दुचाकी जप्त

गॅस सिलेंडर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४५ सिलेंडर आणि ३ दुचाकी जप्त

NEWS डंका 2 weeks ago

पवई पोलिसांकडून कारवाई

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील नागरिकांमध्ये गॅस सिलेंडर चोरीमुळे पसरलेली भीती दूर करण्यात पवई पोलिसांना मोठे यश आले आहे. गॅस सिलेंडर चोरणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीचे ४५ गॅस सिलेंडर आणि गुन्ह्यात वापरलेल्या ३ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

पवई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. चोरीला गेलेल्या सुझुकी बर्गमन या गाडीचा वापर करून एक इसम मुंबई आणि ठाणे परिसरात गॅस सिलेंडर चोरत असल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून राज चंद्रकांत कांबळे (४५, रा. वर्तक नगर, ठाणे) याला ताब्यात घेतले.

आरोपी राज कांबळे याच्याकडून पोलिसांनी विविध ठिकाणांहून चोरलेले एकूण ४५ गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. तसेच चोरीसाठी वापरलेल्या ३ मोटारसायकलही ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या चोरीच्या मालाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या अन्य दोन आरोपींवरही पोलिसांनी कारवाई केली आहे.

अटक करण्यात आलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पवई,शिवाजी पार्क,पार्क साईड आणि नवी मुंबईत चोरीचे एकूण १० गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील गुन्ह्यांचा समावेश आहे.

आपत्तीग्रस्त अफगाणिस्तानला भारताने दिला माणुसकीचा हात

रिनिकी सरमा वादात काँग्रेसचा 'फेक' गेम उघड!

'धुरंधरमध्ये स्फोट लियारीत, पण धूर वांद्रे-जुहूत'

'कराराची मंगळवारची मुदत चुकल्यास सर्व उध्वस्त करणार!'

आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरच्या तुटवड्याबाबत सर्वसामान्यांमध्ये चिंता असताना, ही टोळी सक्रिय झाल्यामुळे पोलिसांनी दोन विशेष पथके तयार करून हा तपास अत्यंत वेगाने पूर्ण केला. ही यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे, पोलीस निरीक्षक संजय बंडगर, सपोनि संतोष कांबळे, पोउपनि गणेश आव्हाड आणि त्यांच्या पथकाने बजावली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka