Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
घरून काम, फक्त सहा आठवड्यांचे जेट इंधन शिल्लक

घरून काम, फक्त सहा आठवड्यांचे जेट इंधन शिल्लक

NEWS डंका 1 month ago

अमेरिका- इराण संघर्षात युरोपमध्ये ऊर्जा संकट

मेरिका आणि इराण यांच्यातील १५ दिवसांच्या शस्त्रसंधीची अंतिम मुदत जवळ येत असून संघर्ष अजून शमलेला नाही. दोन्ही देशांनी एकमेकांवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

इराणने पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याचे बोलले जात आहे. रविवारी या सामुद्रधुनीतून एकही जहाज गेले नाही. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. जगातील जवळपास २० टक्के तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाते. युरोपला लागणारे ३९ टक्के जेट इंधन आणि केरोसीन याच सामुद्रधुनीतून जाते. यामुळेच, आशियानंतर आता युरोपमध्येही गदारोळ माजला आहे.

युरोपमधील ऊर्जा संकट अधिकच गडद झाले आहे. युरोपियन आयोगाने लोकांना घरून काम करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, पेट्रोल आणि डिझेलची बचत करण्यासाठी लोकांनी स्वतःच्या वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असेही आयोगाने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या (IEA) ताज्या आकडेवारीनुसार, युरोपमध्ये केवळ सहा आठवड्यांचे जेट इंधन शिल्लक आहे. यामुळे, अत्यावश्यक नसलेल्या मार्गांवरील उड्डाणे रद्द होऊ शकतात.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे युरोप आधीच ऊर्जा संकटाचा सामना करत होता आणि आता इराण युद्धामुळे त्याच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. यामुळे युरोपमध्ये महागाई वाढण्याची शक्यता आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणारे बहुतेक तेल आशियाई देशांसाठी असते, त्यामुळेच आशियाई देशांमध्ये खळबळ उडाली आहे. फिलीपिन्सने तर नऊ दिवसांपूर्वी ऊर्जा आणीबाणी जाहीर केली आहे.

पाकिस्तानमधील चर्चेसाठी इराणची पाठ!

ड्रोन आयात प्रकरणी लाचखोरीच्या आरोपावरून DGCA चे उपमहानिदेशक अटकेत

जम्मू-कश्मीरच्या पुलवामामध्ये ७.५० ग्रॅम हेरॉईनसह दोन तस्कर अटकेत

अमेरिकी सैन्य जहाजांवर इराणचे ड्रोन हल्ले

गेल्या वर्षी, पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी आणि अरबी समुद्राशी जोडणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या कच्च्या तेलापैकी ४५ टक्के तेल आशियाई देशांमध्ये गेले. आशियाई देश याच मार्गातून ३० टक्के पेट्रोल आणि नॅफ्था, ९ टक्के डिझेल आणि ५ टक्के जेट इंधन देखील आयात करतात. त्याचप्रमाणे, युरोपचे ३९ टक्के विमान इंधन आणि केरोसीन याच मार्गातून जाते. त्याचप्रमाणे, आफ्रिकेचे ४१ टक्के जेट इंधन आणि २३ टक्के डिझेल याच मार्गातून जाते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka