Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
घसरला. लढला. जिंकला! सिनरची विंबल्डनमध्ये विजयी एन्ट्री

घसरला. लढला. जिंकला! सिनरची विंबल्डनमध्ये विजयी एन्ट्री

विंबल्डन २०२६ मध्ये पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू जानिक सिनर याने जबरदस्त संघर्षानंतर सर्बियाच्या मियोमिर केकमॅनोविचचा ४-६, ६-३, ६-७ (६), ६-२, ६-३ असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

तब्बल ३ तास ३० मिनिटे रंगलेल्या या लढतीत सिनरने दमदार पुनरागमन करत विजयी मुसंडी मारली.

सेंटर कोर्टवर झालेल्या या सामन्यात सिनरकडून तब्बल ५२ अनफोर्स्ड एरर्स झाल्याने मोठ्या उलटफेराची शक्यता निर्माण झाली होती. तिसऱ्या सेटमध्ये केकमॅनोविचने अप्रतिम खेळ करत सामना पूर्णपणे रंगतदार केला. टाय-ब्रेकदरम्यान त्याने सिनरला कोर्टभर पळवले आणि एका अप्रतिम रॅलीमध्ये इटालियन स्टारला डाइव्ह मारावी लागली.

या सामन्यात सिनर दोन वेळा कोर्टवर घसरला. तिसऱ्या सेटमध्ये २-२ अशा स्थितीत तो धोकादायक पद्धतीने पडला आणि त्याचा गुडघा वळल्याने प्रेक्षकांची धडधड वाढली. मात्र, कोणताही वैद्यकीय ब्रेक न घेता त्याने पुन्हा खेळ सुरू केला आणि अखेरीस सामना आपल्या नावावर केला.

निर्णायक पाचव्या सेटमध्ये सिनरने चुका कमी करत खेळावर पूर्ण नियंत्रण मिळवले आणि विजय निश्चित केला. या विजयासह त्याने विंबल्डनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला असून, आता त्याची लढत पोर्तुगालच्या नुनो बोर्जेसविरुद्ध होणार आहे.

या विजयासह सिनरने मोठ्या स्पर्धांमधील आपल्या ९४व्या विजयाची नोंद केली. या कामगिरीसह त्याने इटलीच्या दिग्गज निकोला पिएत्रांजेली यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka