Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोरखपुरात उभं राहणार क्रिकेटचं भव्य स्वप्न!

गोरखपुरात उभं राहणार क्रिकेटचं भव्य स्वप्न!

त्तर प्रदेशला तिसरे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मिळणार असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शनिवारी गोरखपूर इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करणार आहेत. सुमारे ३९३ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येणारे हे स्टेडियम अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असणार आहे.

गोरखपूर इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम ४६ एकर परिसरात उभारले जाणार असून त्याची प्रेक्षक क्षमता ३० हजार असेल. स्टेडियम पूर्ण करण्याची अंतिम मुदत २३ डिसेंबर २०२७ निश्चित करण्यात आली आहे.

पूर्व स्टँडमध्ये १४,४९० तर पश्चिम स्टँडमध्येही १४,४९० प्रेक्षक बसण्याची व्यवस्था असणार आहे. 'ग्राउंड प्लस टू फ्लोअर' डिझाइनवर हे स्टेडियम विकसित करण्यात येणार आहे. मैदानावर एकूण ७ मुख्य खेळपट्ट्या तयार केल्या जातील, तर खेळाडूंच्या सरावासाठी स्वतंत्र ४ पिच असतील.

उत्तर पॅव्हेलियनमध्ये २०८ व्हीआयपींसाठी विशेष आसनव्यवस्था असेल, तर ३८२ जागा माध्यम प्रतिनिधींसाठी राखीव असतील. दक्षिण पॅव्हेलियनमध्ये १,७०८ व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपींसाठी खास व्यवस्था करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने रात्री खेळता यावेत यासाठी स्टेडियममध्ये ४ हायमास्ट लाईट्स बसवण्यात येणार आहेत. क्रिकेटसह इतर क्रीडा स्पर्धा आणि मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही येथे केले जाऊ शकते.

कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनेही हे स्टेडियम महत्त्वाचे ठरणार आहे. गोरखपूर विमानतळ स्टेडियमपासून २४ किलोमीटर अंतरावर असेल, तर रेल्वे स्थानक सुमारे २० किलोमीटरवर असेल. तसेच गोरखपूर-वाराणसी फोरलेन महामार्गाशीही हे स्टेडियम जोडलेले असेल.

उत्तर प्रदेशमधील हे तिसरे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम ठरणार आहे. सध्या कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियम आणि लखनौतील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल सामने खेळवले जातात.

या प्रकल्पासाठी देशातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांकडून सीएसआर निधीतून १०० कोटी रुपयांचे योगदान दिले जाणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ६० कोटी, भारत पेट्रोलियम ३० कोटी आणि हिंदुस्तान पेट्रोलियम १० कोटी रुपये देणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka