Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोरेगावात रोटीवर थुंकून ग्राहकांना जेवण वाढले.

गोरेगावात रोटीवर थुंकून ग्राहकांना जेवण वाढले.

NEWS डंका 1 month ago

हॉटेल कामगार आणि मालकावर गुन्हा दाखल

गोरेगाव पूर्व भागातील एका हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हॉटेलमध्ये रोटी बनवणारा कामगार रोटीवर थुंकून ती ग्राहकांना देत असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी हॉटेलचा कामगार आणि मालक या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार दीपक दत्ताराम पवार (वय ४८) हे २३ मे रोजी रात्रीच्या जेवणासाठी गोरेगाव पूर्वेतील 'फिश कोळीवाडा हॉटेल'मध्ये गेले होते. तिथे त्यांना जेवण बनवणारा इसम रोटीवर थुंकून ती भट्टीमध्ये गरम करत असल्याचे दिसले. पवार यांनी या प्रकाराचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर त्यांनी हा प्रकार परिसरातील काही लोकांना दाखवला असता, त्यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला.

​या प्रकारानंतर २५ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास स्थानिक नागरिकांनी १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांना पाचारण केले आणि हा सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित कामगाराला ताब्यात घेतले. ​चौकशीअंती या कामगाराचे नाव कौशार गफार शेख (वय ५३) असल्याचे निष्पन्न झाले.

भारताची हवाई सुरक्षा आणखी मजबूत!

बकरी ईदनिमित्त सोसायट्यांत बकऱ्या, घाटकोपरमध्ये सोमय्यांनी दिली भेट

पोर्शे अपघातातील आरोपी मुलाचे आईवडील नृत्य, हास्यविनोदात दंग, लोकांचा संताप

मीरा रोडमध्ये बोकडांच्या शेडला 'वराहपूजना'ने उत्तर

कौशार शेख याला आपल्या थुकीमुळे इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो आणि संसर्ग पसरू शकतो, याची जाणीव असतानाही त्याने जाणीवपूर्वक हे कृत्य केले. तसेच, हॉटेलचा मालक फैय्याज अहमद शेख याला ही बाब माहित असूनही त्याने ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खेळल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. ​याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २७१, २७५ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक राहुल दळवी पुढील तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka