Dailyhunt
गुढीपाडव्याला सोन्याची विक्रीत मोठी वाढ

गुढीपाडव्याला सोन्याची विक्रीत मोठी वाढ

NEWS डंका 1 month ago

कमी किमतींचा ग्राहकांनी घेतला फायदा

गुढीपाडवानिमित्त देशभरात यंदा सोन्याच्या खरेदीला मोठी चालना मिळाली असून कमी झालेल्या किमतींचा ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात फायदा घेतला. उद्योगातील प्राथमिक अंदाजानुसार, गुढीपाडव्याच्या दिवशी भारतात सुमारे १८ ते २२ टन सोन्याची विक्री झाली आहे.

यामध्ये दागिने, नाणी आणि बार या सर्व प्रकारांचा समावेश असून गेल्या वर्षाच्या तुलनेत विक्रीत सुमारे १५ ते २० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांतील ज्वेलर्सकडे ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासूनच अनेक दुकानांमध्ये खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी हलक्या वजनाच्या दागिन्यांना आणि सोन्याच्या नाण्यांना विशेष मागणी दिसून आली, तर गुंतवणूक म्हणूनही अनेकांनी सोन्याची खरेदी केली.

इराणच्या तेलावरील निर्बंध अमेरिका हटवणार? काय म्हणाले अमेरिकेचे अर्थमंत्री?

'इराणची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे बनवण्याची क्षमता संपली!'

इराणच्या गॅस प्रकल्पावर हल्ला करून इस्त्रायलची मोठी चूक

सोन्याच्या किमती अलीकडच्या काळात थोड्या प्रमाणात कमी झाल्यामुळे ग्राहकांचा कल खरेदीकडे वाढला. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीतील घसरण, डॉलरमधील चढ-उतार आणि स्थानिक बाजारातील परिस्थिती यामुळे सोनं तुलनेने स्वस्त झालं. त्यामुळे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अनेकांनी ही संधी साधत खरेदी केली.

गुढीपाडवा हा सण परंपरेने सोनं खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे किंमतीत झालेली घट आणि सणाचा मुहूर्त यांचा दुहेरी परिणाम बाजारावर दिसून आला. याशिवाय लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने दागिन्यांची मागणी अधिक वाढली. अनेक ज्वेलर्सनी विशेष सवलती, मेकिंग चार्जेसमध्ये कपात आणि ईएमआयसारख्या ऑफर्स दिल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद आणखी वाढला.

एकूणच, गुढीपाडवा २०२६ हा सोन्याच्या बाजारासाठी अत्यंत सकारात्मक ठरला असून आगामी अक्षय तृतीया आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांतही सोन्याच्या मागणीत वाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka