Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हॉटेलच्या खोलीत २७ वर्षीय डॉक्टर तरुणीचा मृतदेह

हॉटेलच्या खोलीत २७ वर्षीय डॉक्टर तरुणीचा मृतदेह

NEWS डंका 2 weeks ago

सोन्याच्या चेनवरून मित्रासोबत वाद, तरुणाचा शोध सुरू

हैदराबादमधील मियापूर परिसरात एका हॉटेलच्या खोलीत २७ वर्षीय डॉक्टर तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. कोमाती श्रीजना असे मृत डॉक्टरचे नाव असून ती हनमकोंडा येथील वैद्यकीय महाविद्यालयात बालरोगशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती.

कुटुंबीयांचा तिच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी मियापूरमधील हॉटेलचा शोध घेतला असता खोलीत श्रीजनाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार मृतदेहाची अवस्था कुजलेली होती.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, श्रीजना ३० सप्टेंबर रोजी एका पुरुष मित्र रवी कुमारला भेटण्यासाठी हैदराबादला आली होती. सोन्याची चेन परत करण्याच्या कारणावरून तिला हॉटेलमध्ये बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोघे काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि त्यांच्या नात्याबाबतही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, हॉटेलमध्ये नेमके काय घडले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. संबंधित रवी कुमार १ ऑक्टोबर रोजी हॉटेलमधून बाहेर पडल्याचे आणि त्यानंतर तो बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत तेल टँकरवर हल्ला

श्रीजनाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, त्यानंतर मियापूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात मृतदेहावर स्पष्ट बाह्य जखमा आढळलेल्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी मृतदेह गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर पुरावे तपासले जात असून बेपत्ता असलेल्या रवी कुमारचा शोध घेण्यासाठी पथके काम करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि पुढील तपासानंतर या संशयास्पद मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka