Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इराणच्या दक्षिण किनाऱ्याजवळ दोन मच्छिमारी नौकांवर ड्रोन हल्ला

इराणच्या दक्षिण किनाऱ्याजवळ दोन मच्छिमारी नौकांवर ड्रोन हल्ला

NEWS डंका 1 month ago

मच्छीमार बेपत्ता

इराणच्या दक्षिण किनाऱ्याजवळ सोमवारी रात्री मच्छिमारी करणाऱ्या दोन नौकांवर ड्रोन हल्ला झाला. इराणच्या अर्ध-सरकारी मेहर वृत्तसंस्थेनुसार, या घटनेनंतर अनेक मच्छीमार बेपत्ता झाले आहेत.

हा हल्ला दक्षिणेकडील बंदर शहर कार्गनच्या किनाऱ्याजवळ आणि लारक बेटाच्या परिसरात झाला. होर्मुझगान प्रांताचे राजकीय आणि सुरक्षा विषयक उपराज्यपाल अहमद नफीसी यांनी सांगितले की, बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेण्यासाठी शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, या घटनेची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती शेअर केली जाईल.

दरम्यान, यापूर्वी इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)च्या नौदलाने सांगितले होते की, होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न करणारा एक मोठा तेलवाहू टँकर समुद्री बारूदी सुरंगांना (नौदलातील माईन्स) धडकला. त्यानंतर त्यात स्फोट होऊन आग लागली. आयआरजीसीच्या अधिकृत वृत्तमंच सेपाह न्यूजवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार, 'एल गैया' नावाच्या या सुपर ऑइल टँकरला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत आणि संपूर्ण जहाज आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.

नौदलाने सांगितले की, या महत्त्वाच्या सागरी मार्गाच्या दक्षिण भागात असलेल्या 'प्रतिबंधित' किंवा 'बेकायदेशीर' मार्गाचा वापर करण्याच्या धोक्याबाबत आधीच इशारा देण्यात आला होता. निवेदनात पुन्हा स्पष्ट करण्यात आले की, होर्मुझ सामुद्रधुनी अद्याप बंद असून तिच्यावर इराणच्या नौदलाचे नियंत्रण कायम आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील सागरी वाहतुकीवर देखरेख ठेवणाऱ्या इराणच्या पर्शियन गल्फ स्ट्रेट अथॉरिटीने (पीजीएसए) विमा कंपन्या तसेच जहाजांची नोंदणी आणि प्रमाणन करणाऱ्या संस्थांना इशारा दिला आहे.

जम्मू- काश्मीरच्या राजौरीमध्ये लष्करशी संबंधित तिघांना अटक

गुरुग्राममध्ये महिला बाईकस्वाराला धडक देणाऱ्या कल्याण बैंसलाला अटक

अफगाणिस्तानात केरळच्या महिला व्लॉगरला अटकेची धमकी

इमिग्रेशन न करताच तीन इटालियन नागरिक म्युनिकला रवाना

पीजीएसएने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर म्हटले की, आपल्या अद्ययावत यादीत 'नियमांचे उल्लंघन करणारी जहाजे' म्हणून नमूद केलेल्या जहाजांना कोणत्याही प्रकारची सेवा देणे टाळावे. प्राधिकरणाने म्हटले की, विमा कंपन्या, प्रोटेक्शन अँड इंडेम्निटी क्लब आणि जहाजांचे वर्गीकरण करणाऱ्या संस्थांनी या जहाजांना सेवा देण्यापासून दूर राहावे, जेणेकरून त्यांच्याशी संबंधित संभाव्य परिणाम टाळता येतील.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka