Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इराणच्या नतान्झ अणुस्थळाला नुकसान!

इराणच्या नतान्झ अणुस्थळाला नुकसान!

NEWS डंका 3 months ago

नुकसान भूमिगत जागेच्या प्रवेश भागापुरते मर्यादित असल्याची IAEA ची माहिती

अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध कारवाई सुरूच ठेवली असून या संघर्षाची झळ संपूर्ण आखाती देशांमध्ये पसरली आहे.

या संपूर्ण भागात तणावाचे वातावरण असून आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) इराणच्या नतान्झ अणुस्थळावर झालेल्या नुकसानीची पुष्टी केली आहे. उपग्रह प्रतिमांवरून असे दिसून आले आहे की, भूमिगत नतान्झ इंधन समृद्धी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारांच्या इमारतींवर हा हल्ला झाला आहे.

३ मार्च रोजी एक्सवरील एका पोस्टमध्ये, IAEA ने म्हटले आहे की, नुकसान केवळ भूमिगत जागेच्या प्रवेश भागापुरते मर्यादित होते आणि मुख्य संवर्धन संयंत्रात रेडिएशन गळती किंवा नवीन परिणाम आढळला नाही. जूनमध्ये इस्रायल आणि इराणमधील १२ दिवसांच्या संघर्षादरम्यान या जागेचे यापूर्वीही मोठे नुकसान झाले होते. नंतर हा संघर्ष आणखी वाढला आणि अमेरिका इराणविरुद्धच्या युद्धात सामील झाली.

संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा निगरानी संस्थेतील इराणचे राजदूत रेझा नजाफी यांनी व्हिएन्ना येथे झालेल्या बोर्ड बैठकीत पत्रकारांना सांगितले की, अमेरिका आणि इस्रायली लष्करी कारवाईदरम्यान नतान्झला पुन्हा लक्ष्य करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, इराणच्या शांततापूर्ण अणुसुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे.

'आता फक्त नावं वगळलीत, बहुमत मिळाले की, हाकलून लावू!'

भारतीयांच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान मोदींचा ओमानचे सुलतान आणि कुवेतच्या युवराजांना फोन

मुंबईहून दुबईला जाणाऱ्या विमानाला अचानक मिळाला क्षेपणास्त्राचा इशारा आणि…

चीन पुन्हा नापास…आधी पाकिस्तानात आता इराणमध्ये

वॉशिंग्टनस्थित इन्स्टिट्यूट फॉर सायन्स अँड इंटरनॅशनल सिक्युरिटीने पुनरावलोकन केलेल्या उपग्रह प्रतिमांचा हवाला देऊन, भूमिगत युरेनियम समृद्धीकरण संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन प्रभावित भाग दिसत असल्याचे असल्याचे वृत्त दिले. संयुक्त राष्ट्रांचे माजी अणु निरीक्षक आणि विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे प्रमुख डेव्हिड अल्ब्राइट म्हणाले की, 'रविवार दुपार ते सोमवार पहाटेच्या दरम्यान हे हल्ले झाल्याचे दिसून येते.' हा हल्ला अमेरिकेने केला की इस्रायली सैन्याने केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिका- इस्रायली यांच्या समन्वयित कारवाया आणि इराणच्या प्रत्युत्तराच्या हालचालींमुळे संपूर्ण प्रदेशात तणाव वाढत असताना हे नवीन हल्ले करण्यात आले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka