Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इराणकडे शरणागतीशिवाय पर्याय नाही - ट्रम्प यांचा थेट इशारा

इराणकडे शरणागतीशिवाय पर्याय नाही - ट्रम्प यांचा थेट इशारा

NEWS डंका 3 months ago

संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता

श्चिम आशियात वाढलेल्या युद्धजन्य परिस्थितीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर जोरदार हल्लाबोल केला आहे. इराण हा सध्या पश्चिम आशियातील सर्वात मोठा पराभूत देश ठरला असून तो बिनशर्त शरणागती पत्करेपर्यंत ही स्थिती बदलणार नाही, असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला.

इराणने गल्फमधील शेजारी देशांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल माफी मागितल्यानंतर ट्रम्प यांनी ही कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली.

पश्चिम आशियात सध्या संघर्ष तीव्र होत चालला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या लष्करी तळांवर आणि अणु-संबंधित ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे. त्यानंतर इराणकडून इस्रायल तसेच अमेरिकेच्या तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यांमुळे संपूर्ण पश्चिम आशियात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून अनेक देश सतर्क झाले आहेत.

सोने-चांदीत पुन्हा तेजी; २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१.६१ लाखांच्या जवळ

तेहरानमधील मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ लक्ष्य

तेहरानमधील मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ लक्ष्य

या पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन यांनी शेजारील गल्फ देशांशी तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सार्वजनिकरित्या माफी मागत स्पष्ट केले की इराणला या देशांशी संघर्ष नको आहे. 'जोपर्यंत आमच्यावर हल्ला होत नाही, तोपर्यंत आम्ही शेजारील देशांवर हल्ला करणार नाही,' असे त्यांनी सांगितले.

मात्र ट्रम्प यांनी इराणची ही भूमिका कमकुवतपणाचे लक्षण असल्याचा आरोप केला. त्यांच्या मते इराणने वर्षानुवर्षे पश्चिम आशियातील अस्थिरतेला खतपाणी घातले आहे आणि अनेक सशस्त्र गटांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता इराणला कठोर परिणामांना सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सुरू असलेल्या संघर्षामुळे इराणमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यांमुळे काही महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी स्फोट झाले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू ठेवले आहेत.

या संघर्षाचा परिणाम जागतिक पातळीवरही जाणवत आहे. तेलाच्या किंमतीत वाढ, विमान वाहतुकीवर परिणाम आणि जागतिक आर्थिक बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढल्यास त्याचा मोठा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्याच्या घडीला पश्चिम आशिया प्रचंड तणावाखाली आहे. इराण शेजारी देशांशी तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत असला तरी अमेरिका आणि इस्रायलचा दबाव वाढत असल्याने या संघर्षाचा शेवट कधी आणि कसा होईल याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka