Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'इराणने इस्रायलच्या नागरिकांच्या सामुहिक हत्येचा प्रयत्न केला'

'इराणने इस्रायलच्या नागरिकांच्या सामुहिक हत्येचा प्रयत्न केला'

NEWS डंका 3 months ago

पंतप्रधान नेतान्याहू यांनी केली टीका

स्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि राष्ट्रपती आयझॅक हरझोग यांनी २२ मार्च २०२६ रोजी दक्षिण इस्रायलमधील अराद आणि डिमोना या शहरांना भेट देऊन इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

अहवालानुसार, इराणने डागलेल्या किमान दोन क्षेपणास्त्रांनी इस्रायलच्या आयरन डोम संरक्षण प्रणालीला चकवा देत डिमोना परिसरातील निवासी भागात मारा केला. हा भाग संवेदनशील नेगेव्ह न्यूक्लिअर रिसर्च सेंटरजवळ आहे.

या हल्ल्यांमध्ये सुमारे २०० नागरिक जखमी झाले. त्यापैकी १७५ जणांवर सोरोका मेडिकल सेंटर येथे उपचार करण्यात आले, ज्यामध्ये ११ ते ३६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. सुदैवाने, कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. अराद येथे अनेक निवासी इमारतींना मोठे नुकसान झाले असून काही इमारती अंशतः उद्ध्वस्त झाल्या.

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणच्या या हल्ल्यांना 'नागरिकांच्या सामूहिक हत्येचा प्रयत्न' असे संबोधत इराणच्या लष्करी क्षमतेचा पूर्ण नाश करण्याचा निर्धार पुन्हा व्यक्त केला. डिमोनावर झालेला हल्ला विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण येथे शिमॉन पेरेस नेगेव्ह न्यूक्लिअर रिसर्च सेंटर आहे. हा इस्रायलचा प्रमुख आणि अधिकृतपणे न जाहीर केलेला अणुउर्जा प्रकल्प मानला जातो. तज्ञांच्या मते, हा प्रकल्प इस्रायलच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असून येथे हेवी वॉटर रिऍक्टर आणि प्लुटोनियम रिप्रोसेसिंग सुविधा आहेत.

हल्ल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा केंद्राने स्पष्ट केले की अणुउर्जा केंद्राला कोणतेही नुकसान झालेले नाही. हा प्रकल्प नेगेव वाळवंटात, डिमोना शहरापासून सुमारे १३ किमी अंतरावर अतिशय सुरक्षित परिसरात स्थित आहे. तर अराद हे शहर डिमोनाच्या ईशान्येस सुमारे ३०-४०किमी अंतरावर असून ते निवासी, लॉजिस्टिक आणि सहाय्यक तांत्रिक केंद्र म्हणून कार्य करते.

पाक सुपर लीगमधील विदेशी खेळाडू वाऱ्यावर

'इंधनाची काळजी नाही, भारताकडे ५३ लाख मेट्रिक टन पेट्रोलियम साठा!'

नाल, चाबुआ हवाई तळाची माहिती पाकिस्तानला देणाऱ्या हवाई दलाच्या कर्मचाऱ्याला अटक

एअर कॅनडाचे विमान लँडिंगवेळी अग्निशमन दलाच्या वाहनाला धडकले

इराणकडून अराद आणि डिमोना या दोन्ही ठिकाणांवर करण्यात आलेला हल्ला आणि इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालीचे अपयश हे चालू युद्धात महत्त्वाचे ठरले आहे. कारण हे दोन्ही भाग इस्रायलच्या अणु कार्यक्रमाच्या केंद्राजवळ आहेत. इराणने या हल्ल्यांना त्यांच्या नतांझ न्यूक्लिअर फॅसिलिटीवर इस्रायलने केलेल्या कारवाईला दिलेले प्रत्युत्तर असल्याचे सांगितले आहे.

२२ मार्च २०२६ रोजीचा हा हल्ला अत्यंत संरक्षित भागात इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालीच्या अपयशाचे दुर्मिळ उदाहरण ठरला असून, प्रगत संरक्षण यंत्रणांमध्येही काही मर्यादा आणि कमकुवत दुवे असू शकतात, हे यामुळे स्पष्ट झाले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka