Dailyhunt
IRINS देना बुडण्यापूर्वी भारताने दुसऱ्या इराणी जहाजाला दिलेला आश्रय

IRINS देना बुडण्यापूर्वी भारताने दुसऱ्या इराणी जहाजाला दिलेला आश्रय

NEWS डंका 1 month ago

श्रीलंकेजवळील हिंदी महासागरात बुधवारी एका इराणी जहाजाला अमेरिकन पाणबुडीने टॉर्पेडोने उडवून बुडवले होते. तर, हिंद महासागरात अमेरिकेच्या हल्ल्याचे लक्ष्य बनण्यापूर्वीच श्रीलंकेच्या सरकारने आणखी एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे.

अशातच आता माहिती समोर आली आहे की, अमेरिकेच्या पाणबुडीने इराणी फ्रिगेट बुडवण्याच्या काही दिवस आधी, तांत्रिक समस्या निर्माण झाल्यानंतर कोची येथे दुसरे नौदल जहाज तातडीने डॉकिंग करण्याची मागणी करण्यासाठी इराणने भारताशी संपर्क साधला होता.

२८ फेब्रुवारी रोजी, ज्या दिवशी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ले केले, त्या दिवशी तेहरानने IRINS लावनला कोची येथे डॉक करण्याची परवानगी मागितली, कारण जहाजात तांत्रिक समस्या निर्माण झाल्या आहेत आणि त्यावर तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हे जहाज आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यूसाठी या प्रदेशात होते. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने यासंबंधी वृत्त दिले आहे. यानंतर १ मार्च रोजी मंजुरी देण्यात आली होती IRINS लावन ४ मार्च रोजी कोची येथे दाखल झाले. या जहाजातील १८३ जणांच्या कर्मचाऱ्यांना सध्या दक्षिणेकडील बंदर शहरातील नौदल सुविधांमध्ये ठेवण्यात आले आहे.

IRINS लावनला अगदी वेळेत सुरक्षित बंदर मिळाले, परंतु विशाखापट्टणम येथे लष्करी सरावात सहभागी झाल्यानंतर इराणला परतणारी IRINS देना हे जहाज ४ मार्च रोजी अमेरिकेच्या पाणबुडीतून डागण्यात आलेल्या टॉर्पेडोने उडवल्यानंतर हिंद महासागरात बुडाले. या हल्ल्यामुळे इराण, अमेरिका आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षात तणाव वाढला.

दक्षिण श्रीलंकेच्या गॅले बंदरापासून सुमारे ४० नॉटिकल मैल अंतरावर आंतरराष्ट्रीय समुद्रात ही घटना घडली. युद्धनौकेने पहाटे स्फोट झाल्याची माहिती देत आपत्कालीन सूचना दिली होती परंतु श्रीलंकेची बचाव जहाजे घटनास्थळी पोहोचेपर्यंत ती आधीच बुडाली होती. जहाज बुडाल्याने ८० हून अधिक खलाशांचा मृत्यू झाला.

पाहुणे म्हणून आलेल्या इराणी जहाजाला मदत न केल्याबद्दल भारतातू टीका होत असताना, भारतीय नौदलाने IRINS देना बुडाल्याच्या दिवशी नेमके काय घडले ते स्पष्ट केले. गुरुवारी एका निवेदनात, नौदलाने सांगितले की फ्रिगेटकडून संकटाचा संकेत मिळाल्यानंतर त्यांनी शोध आणि बचाव कार्य सुरू केले. श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी आधीच सुरू केलेल्या शोधकार्यांना गती देण्यासाठी एक लांब पल्ल्याचे सागरी गस्त विमान तैनात करण्यात आले होते, तर हवेत सोडता येणारे लाईफ राफ्ट्सने सुसज्ज असलेले दुसरे विमान स्टँडबाय ठेवण्यात आले होते. त्यावेळी परिसरात कार्यरत असलेल्या INS तरंगिनीला बचाव मोहिमेत मदत करण्यासाठी वळवण्यात आले. आणखी एक जहाज, INS इक्षक, शोध मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी कोचीहून रवाना झाले आणि मानवतावादी उपाय म्हणून बेपत्ता कर्मचाऱ्यांना शोधण्यात मदत करण्यासाठी ते या प्रदेशातच आहे, असे नौदलाने सांगितले.

राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी काय?

'लाडकी बहिण योजना' सुरूच राहणार!

बळीराजाला दिलासा! पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत २ लाखांपर्यंतची कर्जमाफी

अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारणार

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी फ्रिगेट बुडण्याच्या घटनेचा निषेध केला होता. या घटनेला त्यांनी 'समुद्रातील क्रूरता' म्हटले होते. त्यांनी म्हटले होते की, जवळजवळ १३० खलाशांना घेऊन जाणारे जहाज इराणच्या किनाऱ्यापासून सुमारे २००० मैल अंतरावर आंतरराष्ट्रीय पाण्यात कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय उडवले गेले. तर, अमेरिकेचे संरक्षण सचिव हेगसेथ यांनी हल्ल्याची पुष्टी केली आणि त्याला टॉर्पेडोने दिलेला 'शांत मृत्यू' असे वर्णन केले. त्यांनी सांगितले की हा हल्ला अमेरिका- इस्रायलच्या इराणवरील संयुक्त हल्ल्यामुळे सुरू असलेल्या संघर्षातील ऑपरेशन्सचा एक महत्त्वपूर्ण विस्तार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka