Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'इस्लामकडून फ्रान्स काबीज करण्याचा प्रयत्न'; ट्रम्प यांचा स्थलांतराकडे इशारा

'इस्लामकडून फ्रान्स काबीज करण्याचा प्रयत्न'; ट्रम्प यांचा स्थलांतराकडे इशारा

NEWS डंका 2 weeks ago

विद्यार्थी आंदोलनावर ट्रम्प यांची टीका

फ्रान्समध्ये शिक्षण व्यवस्थेतील अपुऱ्या सुविधा, शिक्षकांची कमतरता आणि शाळांच्या दुरवस्थेविरोधात सुरू असलेल्या मोठ्या विद्यार्थी आंदोलनावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

फ्रान्समधील आंदोलनाचा संबंध शिक्षण व्यवस्थेतील समस्यांपेक्षा अनियंत्रित स्थलांतर आणि इस्लामच्या वाढत्या प्रभावाशी असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. फ्रान्समध्ये अडीच लाखांहून अधिक लोक रस्त्यावर उतरले असतानाच ट्रम्प यांनी ही टिप्पणी केली.

ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर पोस्ट करत फ्रान्समधील परिस्थितीवर भाष्य केले. फ्रान्समध्ये जे काही घडत आहे ते 'अनियंत्रित मोठ्या प्रमाणातील स्थलांतरा'चा परिणाम असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, हे आंदोलन शाळांशी संबंधित नसून 'एकेकाळी महान असलेला फ्रान्स इस्लामला ताब्यात घ्यायचा आहे', असा दावा त्यांनी केला.

फ्रान्समध्ये सप्टेंबरपासून उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. शाळांमधील अपुऱ्या सुविधा, जुन्या आणि खराब इमारती, वर्गांमधील वाढती गर्दी, शिक्षकांची कमतरता आणि शिक्षणासाठी पुरेशा निधीअभावी विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. सुरुवातीला पॅरिसमधील गरीब भागांत सुरू झालेले हे आंदोलन हळूहळू देशभर पसरले. सरकारी आकडेवारीनुसार, देशभरात सुमारे २.६६ लाख लोक रस्त्यावर उतरले, तर आंदोलकांनी हा आकडा सुमारे ४.५ लाख असल्याचा दावा केला. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि विविध संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला.

रशिया किनाऱ्याजवळ भारतीय क्रू असलेल्या तेल टँकरवर ड्रोन हल्ला

न्यूट्रिनो कणांच्या शोधासाठी फ्रान्सिस हॅल्झेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल

डॉक्टरची पदवी नाही, तरी थाटात दवाखाने

इटलीची क्वार्टर फायनलच्या शर्यतीत दमदार झेप

अनेक ठिकाणी आंदोलने शांततेत झाली असली तरी काही शहरांमध्ये परिस्थिती चिघळली. स्ट्रासबर्ग, लियॉन आणि रेनेस येथे आंदोलकांनी आग लावणे आणि पोलिसांवर वस्तू फेकण्याच्या घटना घडल्या. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. आंदोलनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर अटक करण्यात आली असून, अनेक विद्यार्थी आणि पोलीस जखमी झाले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka