Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इस्रायलकडून भारताला 'हेक्सागन ऑफ अलायन्सेस'मध्ये सामील होण्याचा प्रस्ताव

इस्रायलकडून भारताला 'हेक्सागन ऑफ अलायन्सेस'मध्ये सामील होण्याचा प्रस्ताव

NEWS डंका 4 months ago

पंतप्रधान मोदी २५ फेब्रुवारीपासून इस्रायलच्या दोन दिवसीय दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २५ फेब्रुवारीपासून इस्रायलच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी 'हेक्सागन ऑफ अलायन्सेस' नावाच्या नव्या प्रादेशिक आघाडीचा प्रस्ताव मांडत भारताला त्यात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.

हा सहा देशांचा गठबंधन असेल आणि त्याचा उद्देश पश्चिम आशियातील तथाकथित कट्टर शिया आघाडीला प्रत्युत्तर देणे असा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नेतन्याहू यांनी मंत्रिमंडळ बैठकीच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींच्या भेटीला ऐतिहासिक असे संबोधले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर त्यांनी लिहिले की, 'आज सकाळी आमच्या कॅबिनेट बैठकीत मी माझे प्रिय मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या बुधवारी होणाऱ्या ऐतिहासिक इस्रायल भेटीबद्दल बोललो.' त्यांनी भारत- इस्रायल संबंधांना दोन जागतिक नेत्यांमधील प्रभावी भागीदारी असेही वर्णन केले आणि नवोन्मेष, सुरक्षा व सामायिक धोरणात्मक दृष्टीकोन यांत दोन्ही देश सहकारी असल्याचे नमूद केले.

नेतन्याहू यांच्या मते, या सहा देशांच्या आघाडीत पश्चिम आशिया व त्याच्या आसपासचे देश सहभागी असतील. त्यांनी उल्लेख केलेल्या देशांमध्ये भारत, ग्रीस, सायप्रस तसेच काही अरब, आफ्रिकी आणि आशियाई देशांचा समावेश आहे. ते म्हणाले, 'माझ्या दृष्टीकोनानुसार आपण एक संपूर्ण प्रणाली उभारू — प्रत्यक्षात पश्चिम आशियाभोवती किंवा त्याच्या आत 'हेक्सागन' स्वरूपाची आघाडी. उद्देश असा की वास्तव, आव्हाने आणि उद्दिष्टांबाबत एकमत असलेली देशांची आघाडी निर्माण करणे, जी कट्टर शिया आघाडी आणि उदयोन्मुख कट्टर सुन्नी आघाडीला तोंड देईल.' हा पुढाकार भारत- मध्य पूर्व- युरोप आर्थिक कॉरिडॉर (IMEC) या संकल्पनेशी सुसंगत मानली जात आहे. या उपक्रमाचा हेतू संपर्कवृद्धीद्वारे आर्थिक विकासाला चालना देणे हा आहे. प्रस्तावित 'हेक्सागन' आर्थिक सहकार्य, राजनैतिक समन्वय आणि सुरक्षा भागीदारी या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित असेल.

काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वांनी 'बिनशर्ट' आंदोलन करणाऱ्यांना दाखवला आरसा

मंगळवारपासून ट्रम्प यांनी लादलेले अवैध टॅरिफ वसुली थांबणार!

द केरळ स्टोरी २ ला प्रचारकी म्हणणाऱ्या अनुराग कश्यपला झापले

क्रिकेटचा कालावधी छोटा; म्हणून शिक्षणावरही लक्ष द्या!

२०१७ नंतर पंतप्रधान मोदींची ही इस्रायलची दुसरी भेट आहे. गाझामधील इस्रायल-हमास संघर्षानंतर झालेल्या युद्धविरामाच्या काही महिन्यांनंतर हा दौरा होत आहे. दोन दिवसीय भेटीदरम्यान मोदी इस्रायलच्या संसदेला 'नेसेट'ला संबोधित करण्याची शक्यता आहे, ज्याला विशेष सन्मान मानले जाते. दोन्ही देशांमध्ये तंत्रज्ञान, सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, शेती, जलव्यवस्थापन आणि व्यापार या क्षेत्रांत विविध करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. संरक्षण सहकार्याच्या दृष्टीने अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली, लेझर शस्त्रे, ड्रोन आणि दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या संयुक्त विकासावर चर्चा होऊ शकते. तसेच 'आयर्न डोम', 'डेव्हिड्स स्लिंग' आणि 'अॅरो'सारख्या प्रगत संरक्षण प्रणालींमध्ये सहकार्य वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दौऱ्यापूर्वी मोदी यांनी 'एक्स'वर प्रतिक्रिया देताना लिहिले, 'धन्यवाद, माझे मित्र पंतप्रधान नेतन्याहू… विश्वास, नवोन्मेष आणि शांतता व प्रगतीसाठी समान बांधिलकी यांवर आधारित भारत-इस्रायल मैत्रीला आम्ही मोठे महत्त्व देतो. आगामी इस्रायल भेटीदरम्यान चर्चेची प्रतीक्षा आहे.'

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka