Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इटैलियन ओपनमध्ये मोठा उलटफेर; नोवाक जोकोविच पराभूत!

इटैलियन ओपनमध्ये मोठा उलटफेर; नोवाक जोकोविच पराभूत!

NEWS डंका 2 weeks ago

हा वेळा इटैलियन ओपन जिंकणाऱ्या नोवाक जोकोविचला यंदाच्या स्पर्धेत मोठा धक्का बसला आहे. जगातील ७९व्या क्रमांकाच्या डारियो प्रिजमिकने शानदार पुनरागमन करत जोकोविचला तीन सेटमध्ये पराभूत केले.

क्रोएशियाच्या २० वर्षीय प्रिजमिकने पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त खेळ दाखवत सामना २-६, ६-२, ६-४ असा जिंकला आणि स्पर्धेतून जोकोविचला बाहेरचा रस्ता दाखवला.

विशेष म्हणजे, रोममध्ये खेळल्या जाणाऱ्या इटैलियन ओपनमध्ये जोकोविच पहिल्याच सामन्यात पराभूत होण्याची ही कारकिर्दीतील पहिलीच वेळ ठरली आहे.

प्रिजमिकसाठी ही कारकीर्दीतील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक मानली जात आहे. याआधी त्याने माद्रिद एटीपी मास्टर्स १००० स्पर्धेत बेन शेल्टनला हरवले होते. आता त्याचा पुढील सामना उगो हम्बर्टविरुद्ध होणार आहे.

जोकोविचने पहिला सेट अवघ्या ४० मिनिटांत जिंकत दमदार सुरुवात केली होती. मात्र दुसऱ्या सेटपासून त्यांचा खेळ अचानक खालावला. शॉट्समधील अचूकता कमी झाली आणि अनेक अनफोर्स्ड एरर्समुळे प्रिजमिकला संधी मिळाली.

दुसऱ्या सेटमध्ये प्रिजमिकने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत ४-० अशी आघाडी घेतली. त्याच्या आत्मविश्वासपूर्ण खेळामुळे २४ वेळचा ग्रँड स्लॅम विजेता जोकोविच सतत दबावाखाली दिसला.

निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचने सुरुवातीला झुंज दिली, पण महत्त्वाच्या क्षणी त्यांनी सर्व्हिस गमावली. त्यानंतर त्यांना एकही ब्रेक पॉइंट मिळवता आला नाही. प्रिजमिकने शांत आणि संयमी खेळ करत ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.

जोकोविच आता या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या रोलाँ गॅरोस स्पर्धेकडे लक्ष केंद्रित करतील. त्यांच्या कारकिर्दीतील विक्रमी २५व्या ग्रँड स्लॅम किताबाच्या शोधात ते पुन्हा कोर्टवर उतरणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka