Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

NEWS डंका 3 months ago

वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

राठा इतिहासाचे अभ्यासक, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन झाले. गुरुवार, २६ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास त्यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे पुरस्कर्ते म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांची विशेष ओळख होती.

गेल्या काही दिवसांपासून डॉ. जयसिंगराव पवार यांची प्रकृती अस्वस्थ होती. फुफ्फुसाच्या संसर्गामुळ जवळपास दीड महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरु होते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने एक थोर इतिहासकार हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

डॉ. जगसिंगराव पवार यांचा जन्म ३० डिसेंबर १९४१ रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले, पुढे उच्च शिक्षणासाठी ते कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये आले. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १९६४ मध्ये त्यांच्या संशोधन कारकिर्दीला सुरुवात झाली. एम.ए. परीक्षेत विद्यापीठात प्रथम येण्याचा मान त्यांनी पटकावला होता.

मणिपूरमध्ये कुकी उग्रवाद्यांकडून सैन्याच्या चौकीवर गोळीबार; सुरक्षा कारवाई अधिक तीव्र

वडिलांना भेटू देत नसल्याने इम्रान खान यांच्या मुलाने ठोठावले यूएनएचआरसीचे दार

पर्यटन विभागापासून पोलिसांपर्यंत सर्वांना 'धुरंधर'ची भुरळ; 'हा' डायलॉग प्रचंड ट्रेंडमध्ये

प. बंगालच्या बसीरहाटमधील मतदान यादीतून बीएलओसह ३४० मुस्लिम मतदारांना वगळले

डॉ. जयसिंगराव पवार यांनी मराठा इतिहासातील दुर्लक्षित पैलूंवर प्रकाश टाकला. विशेषतः छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई आणि महाराणी येसूबाई यांच्या जीवनावर त्यांनी सखोल संशोधन केले. त्यांनी २५ पेक्षा अधिक ग्रंथ लिहिले आहेत. राजर्षी शाहू महाराजांचे कार्य आणि विचार जगभरात पोहोचवण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. त्यांनी संपादित केलेला १२०० पानांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ हा इतिहास संशोधनातील एक मैलाचा दगड ठरला आहे. इतिहास संशोधनातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना २१ हून अधिक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka