Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये एक दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये एक दहशतवादी ठार

NEWS डंका 1 month ago

दुसऱ्याचा शोध सुरू

जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील अशदार गली परिसरात भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे.

शोध मोहिमेदरम्यान एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले असून त्याच्याकडून एक एके रायफल आणि युद्धासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, दुसऱ्या दहशतवाद्याचा शोध सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी युसमर्गच्या वरच्या भागात दहशतवादी दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली होती. जवान जंगल परिसरात पुढे सरकत असताना डोंगरावरील जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

'ट्रम्प ज्यांना भेटू इच्छितात, त्या नेत्यांच्या यादीत मोदी सर्वात वर'

टॅक्सी-रिक्षाच्या मीटरमध्ये 'जुगाड'; बनावट भाडेवाढ करून प्रवाशांची लूट

'हनुमान अंश'ची बॉक्स ऑफिसवर कमाल! ७५ कोटींकडे झेप

सोनिया गांधींचे आत्मचरित्र हार्परकॉलिन्स इंडिया करणार प्रकाशित

जवानांनी स्वतःचा बचाव करत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. चकमकीनंतर जवळील छावण्यांमधून सुरक्षा दलांच्या अतिरिक्त तुकड्यांनाही घटनास्थळी रवाना करण्यात आले. त्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरले. शुक्रवारी झालेल्या कारवाईत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले, तर दुसरा दहशतवादी अद्याप सुरक्षा दलांच्या घेराबंदीत अडकला असून त्याचा शोध सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka