Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्यात आढळला पाकिस्तानी फुगा

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्यात आढळला पाकिस्तानी फुगा

NEWS डंका 3 weeks ago

सुरक्षा दलाकडून तपास सुरू

म्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्यातील थानामंडी परिसरातील अजमताबाद गावात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA)चे नाव आणि लोगो असलेला एक फुगा आढळल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी (३० जुलै) दिली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पांढऱ्या आणि लाल रंगाच्या या फुग्यावर Pakistan International Airlines (PIA) असे लिहिलेले होते. स्थानिक नागरिकांना हा फुगा आढळल्यानंतर त्यांनी तो पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी हा फुगा जप्त करून ही केवळ सामान्य घटना आहे की त्यामागे अन्य कोणता उद्देश आहे, याचा तपास सुरू केला आहे.

सुरक्षा यंत्रणांना यापूर्वीही जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानशी संबंधित प्रचारात्मक तसेच खेळण्यांचे अनेक फुगे आढळले आहेत. अधिकांश वेळा असे फुगे वाऱ्यासोबत वाहत भारताच्या हद्दीत येतात. मात्र, सीमावर्ती भागात ड्रोनच्या वाढत्या हालचाली लक्षात घेता अधिकारी प्रत्येक घटनेकडे गांभीर्याने पाहत आहेत.

यापूर्वी एप्रिल महिन्यात जम्मू जिल्यातील अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानचा एक फुगा आढळला होता. मार्चमध्ये राजौरी जिल्यातील सरहोती गावात विमानाच्या आकाराचा एक फुगा सापडला होता. त्यावर उर्दू भाषेत PIA असे लिहिलेले होते. फेब्रुवारी महिन्यात जम्मू जिल्यातील अखनूर सेक्टरमध्ये दोन फुगे आढळले होते. त्यावर पाकिस्तानातील ५,००० रुपयांच्या नोटेचे चित्र, एक अमेरिकन डॉलर आणि पाकिस्तानचा मोबाईल क्रमांक छापलेला होता. त्याच महिन्यात जम्मूच्या आरएस पुरा सेक्टरमध्ये हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचा विमानाच्या आकाराचा PIA लिहिलेला फुगा तसेच पिवळ्या रंगाचा हृदयाच्या आकाराचा फुगाही सापडला होता. जानेवारी महिन्यात अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (LoC) स्थानिकांना इंग्रजी आणि उर्दू भाषेत PIA लिहिलेला विमानाच्या आकाराचा प्रचारात्मक फुगा आढळला होता.

दीपके मोदींनाच भिडू लागला…पंतप्रधानपद सोडा, इन्फ्लुएन्सर बना!

पाकिस्तानात पोलिस चौकीवर झालेल्या हल्ल्यात नऊ पोलिसांचा मृत्यू

'भाजपमध्ये या, नाहीतर परिणाम भोगावे लागतील'

पतंजलीची विमा क्षेत्रात दमदार एंट्री

सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, अशा वस्तू बहुतेक वेळा पाकिस्तानातील व्यावसायिक किंवा उत्सवांमध्ये वापरल्या जाणाऱ्या फुग्यांपैकी असतात आणि वाऱ्यामुळे भारतीय हद्दीत येतात. मात्र, त्यांचा वापर हेरगिरी, संशयास्पद संदेशवहन किंवा अन्य घातपाताच्या उद्देशाने झाला आहे का, याची तपासणी प्रत्येक वेळी केली जाते. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, सीमापार अंमली पदार्थ, शस्त्रास्त्रे किंवा दारुगोळ्याची तस्करी करण्यासाठी ड्रोनचा वापर वारंवार केला जात असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात हवेत कोणतीही संशयास्पद वस्तू दिसताच सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलीस तातडीने परिसराचा ताबा घेण्याची आणि शोधमोहीम राबवण्याची प्रक्रिया सुरू करतात.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka