Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जनगणनेचा शुभारंभ झालाय, उत्साहाने सामील व्हा.

जनगणनेचा शुभारंभ झालाय, उत्साहाने सामील व्हा.

NEWS डंका 3 weeks ago

देशभरात जनगणनेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातही डिजिटल जनगणना होत आहे. यानिमित्त भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी या जनगणनेच्या प्रक्रियेत लोकांनी उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, १ मे, महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर आज जनगणनेला प्रारंभ झालेला आहे. महापालिकेचे सह आयुक्त विश्वास शंकरवार आणि सहाय्यक आयुक्त अनिरुद्ध कुलकर्णी आदी अधिकाऱ्यांनी माझ्या दूध सागर वसाहतीतील घरी येऊन जनगणनेला सुरुवात केली.

१६ वी जनगणना देशाच्या इतिहासातील मोठी आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे. ही केवळ मोजणी नाही, तर भविष्यातील देशाच्या विकासाचा रोडमॅप ठरवणारी प्रक्रिया आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

शिक्षण, आरोग्य, रोजगार, पायाभूत सुविधा, शहरी विकास, गरीब कल्याण योजना आणि संसाधनांचे योग्य नियोजन यासाठी अचूक जनगणना महत्वाची, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पश्चिम बंगालमध्ये १५ मतदान केंद्रांवर उद्या पुनर्मतदान

यूएईचा मोठा इशारा: ३ देश तात्काळ सोडण्याचे नागरिकांना आवाहन

यूएईचा मोठा इशारा: ३ देश तात्काळ सोडण्याचे नागरिकांना आवाहन

सुप्रियाताई तुमच्या सरकारने जे काम थांबवलं ते आम्ही पूर्ण केलं!

यावेळी डिजिटल आणि तंत्रज्ञानाधारित जनगणनेमुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि प्रभावी होणार आहे. प्रत्येक नागरिकाची अचूक माहिती देशाच्या विकासाला नवी दिशा देईल.प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने सहभाग नोंदवून, योग्य माहिती द्यावी, ही विनंती, असेही आमदार भातखळकर यांनी लिहिले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka