Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कच्च्या तेलाची धग बाजाराला; सेन्सेक्स ३०० अंकांहून अधिक घसरला

कच्च्या तेलाची धग बाजाराला; सेन्सेक्स ३०० अंकांहून अधिक घसरला

गुंतवणूकदारांची सुरुवातीच्या व्यवहारात सावध भूमिका

ठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारावर भू-राजकीय तणाव आणि महागलेल्या कच्च्या तेलाचा दबाव स्पष्टपणे दिसून आला. अमेरिका-इराणमधील तणाव निवळण्याची चिन्हे नसताना तेलाच्या किमती सुमारे ८९ डॉलर प्रति बॅरलवर टिकून आहेत.

त्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरुवातीच्या व्यवहारात सावध भूमिका घेतली आणि सेन्सेक्स-निफ्टी लाल चिन्हात उघडले.

बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स १०० अंकांहून अधिक घसरून ७७,८९२.९२ अंकांवर, तर निफ्टी ५० २२.५५ अंकांनी घसरून २४,३४३.४५ अंकांवर खुला. मात्र, सुरुवातीच्या घसरणीनंतर सेन्सेक्समध्ये दबाव आणखी वाढला आणि तो ३०० अंकांहून अधिक घसरल्याचे दिसून आले.

सध्या बाजारासाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती. अमेरिका-इराण तणावामुळे तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारत हा कच्च्या तेलाचा मोठा आयातदार असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती वाढल्यास त्याचा थेट परिणाम देशाच्या आयात खर्चावर आणि कंपन्यांच्या नफ्यावर होऊ शकतो. विशेषतः ऊर्जा, वाहतूक, उत्पादन आणि इतर तेलावर अवलंबून असलेल्या क्षेत्रांवर त्याचा दबाव येऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी जोखीम कमी करण्याला प्राधान्य दिल्याचे दिसते.

बाजारातील घसरण केवळ भू-राजकीय तणावामुळे नाही, तर काही प्रमुख क्षेत्रांच्या कमजोर कामगिरीमुळेही वाढली. आयटी आणि मोठ्या बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव राहिला. निफ्टी ५० मध्ये एचसीएलटेक, इन्फोसिस, टीएमपीव्ही, टीसीएस, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि विप्रो हे प्रमुख घसरणारे शेअर्स ठरले. यामुळे प्रमुख निर्देशांकांवरील दबाव वाढला. व्यापक बाजारातही कमजोरी दिसली. निफ्टी मिडकॅप ०.३६ टक्के आणि स्मॉलकॅप ०.१७ टक्क्यांनी घसरले. निफ्टी मिडस्मॉल फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये जवळपास ०.९८ टक्क्यांची घसरण झाली.

'मला कार्यमुक्त करा' शहजाद पूनावाला यांचा पुन्हा राजीनामा

अरशदीप सिंह डांग ठरले रॉयल एअर फोर्सचे पहिले शीख फायटर पायलट

बिहारच्या मंदिरात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू

सोनियांवरून माकपने काँग्रेसला विचारला जाब

संपूर्ण बाजारात विक्रीचे वातावरण असले तरी काही क्षेत्रांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदी केली. निफ्टी केमिकल्समध्ये ०.४८ टक्के, तर मिडस्मॉल हेल्थकेअर इंडेक्समध्ये सुमारे ०.४५ टक्क्यांची वाढ झाली. त्याचप्रमाणे एचडीएफसी लाइफ, हिंडाल्को, मॅक्स हेल्थ, ओएनजीसी, आयशर मोटर्स आणि टायटन यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka