Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कलिनिनग्राडवर हल्ला झाल्यास अण्वस्त्रांसह पलटवार

कलिनिनग्राडवर हल्ला झाल्यास अण्वस्त्रांसह पलटवार

NEWS डंका 3 weeks ago

पुतिन यांचा नाटोला इशारा

रशिया आणि नाटोमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोठा इशारा दिला आहे. रशियाच्या कलिनिनग्राड या भूभागावर थेट हल्ला झाल्यास मॉस्को आपल्या ताफ्यातील सर्व प्रकारची शस्त्रे, त्यात अण्वस्त्रांचाही समावेश असू शकतो, वापरण्याचा निर्णय घेऊ शकतो, असे पुतिन यांनी म्हटले आहे.

मॉस्कोमध्ये झालेल्या व्हाल्डाय डिस्कशन क्लबच्या बैठकीत बोलताना पुतिन यांनी रशियाला थेट लक्ष्य केल्यास त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असे स्पष्ट केले. कलिनिनग्राड किंवा रशियाच्या अन्य कोणत्याही भूभागावर थेट हल्ला झाल्यास देशाच्या ताब्यातील सर्व शस्त्रांच्या वापराचा प्रश्न तातडीने निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.

कलिनिनग्राड हा रशियाचा मुख्य भूभागापासून वेगळा असलेला बाल्टिक समुद्रालगतचा प्रदेश आहे. तो पोलंड आणि लिथुआनिया या दोन नाटो सदस्य देशांच्या मध्ये स्थित आहे. या भागात रशियाचा बाल्टिक नौदल तळ आणि इतर महत्त्वाची लष्करी साधने आहेत. त्यामुळे रशिया आणि नाटोमधील संभाव्य संघर्षाच्या दृष्टीने कलिनिनग्राडला सामरिक महत्त्व आहे. पुतिन यांच्या वक्तव्यापूर्वी रशियाने नाटोला राजनैतिक संदेश पाठवला होता. नाटो कलिनिनग्राडला रशियाच्या उर्वरित भूभागापासून वेगळे करण्यासाठी हवाई किंवा सागरी नाकेबंदीची तयारी करत असल्याची माहिती मॉस्कोकडे असल्याचा दावा रशियन दूतावासांनी केला होता. रशियाने अशा कोणत्याही प्रयत्नांना प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

मात्र, नाटोने कलिनिनग्राडला लक्ष्य करत असल्याचा दावा फेटाळला आहे. नाटोने स्वतःला बचावात्मक लष्करी आघाडी असल्याचे सांगत रशियाच्या अण्वस्त्रांच्या धमक्यांना विरोध केला आहे. नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांनीही अशा प्रकारची अण्वस्त्रांची भाषा परिस्थिती सुधारण्यास मदत करणारी नसल्याचे म्हटले.

तीस्ता नदीवरील १,१७५ कोटींच्या पुल प्रकल्पाला मंजुरी

भारत-फ्रान्स सागरी सराव 'वरुण'ला सुरुवात

दुबईत स्मित यांच्या कुटुंबीयांची भारतीय राजदूतांनी घेतली भेट

रशियाला युरोपवर हल्ला करायचा नाही

पुतिन यांनी रशियाला कोणत्याही युरोपीय देशावर हल्ला करण्याची योजना नसल्याचे पुन्हा स्पष्ट केले. मात्र, रशियावर थेट हल्ला झाल्यास त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. रशिया आणि नाटोमधील तणाव वाढत राहिल्यास परिस्थिती 'परतीचा मार्ग नसलेल्या टप्प्यावर' पोहोचू शकते, असा इशाराही पुतिन यांनी दिला. रशिया-नाटोमधील हा तणाव युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र झाला आहे. त्यामुळे कलिनिनग्राडबाबत पुतिन यांनी दिलेला इशारा युरोपमधील सुरक्षेच्या समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka