Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कर्णधार ओरडला. तिलक धडाडला!

कर्णधार ओरडला. तिलक धडाडला!

NEWS डंका 1 month ago

रेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या IPL २०२६ मधील सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर तब्बल ९९ धावांनी विजय मिळवत सलग ४ पराभवानंतर दमदार पुनरागमन केले. या विजयाचा खरा नायक ठरला — तिलक वर्माचा स्फोटक शतक !

सामन्याच्या सुरुवातीला मात्र तिलकचा खेळ संथ होता. तो एका टप्प्यावर २२ चेंडूत फक्त १९ धावा करून खेळत होता. त्यामुळे मुंबई पुन्हा पराभवाच्या दिशेने जात असल्याचे चित्र दिसत होते.

याच वेळी क्रीजवर असलेल्या कर्णधार हार्दिक पांड्याने तिलकला जोरदार शब्दांत समजावलं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. सामन्यानंतर हार्दिकने खुलासा करत सांगितले:

'मी त्याला सांगितलं — फक्त बॉल बघ आणि मार! काहीही झालं तरी आक्रमक खेळ. त्याच्या बॅटमधून निघणारा बॉल खास आहे. इतकं ओरडलो की मला चक्करच आली!'

आणि मग काय… तिलकने अक्षरशः सामन्याचा रंगच बदलला!

तिलकचा धमाका:

तिलकने दाखवलेल्या या तुफानी खेळीच्या जोरावर मुंबईने ५ बाद १९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ फक्त १०० धावांवर आटोपला.

हेही वाचा :

सोनं-चांदी दरात मोठी घसरण; जागतिक दबावामुळे बाजार अस्थिर

शेअर बाजारात जोरदार उसळी; सेन्सेक्स ७५३ अंकांनी वधारला

भारतीय ऍथलेटिक्सवर 'अत्यंत उच्च डोपिंग जोखीम'चा ठपका

जर्मनीतील गुरुद्वारात संघर्ष; शस्त्रांसह ४० जण भिडले

 तिलक वर्माला या शानदार कामगिरीसाठी प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला.

मुंबई इंडियन्ससाठी हा विजय फक्त दोन गुणांचा नाही, तर आत्मविश्वास परत मिळवण्याचा मोठा टप्पा ठरला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka