Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
काठुआत सीआयएसएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार

काठुआत सीआयएसएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार

NEWS डंका 3 weeks ago

चार जवानांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील काठुआ जिल्ह्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारात सहाय्यक कमांडंरसह चार सीआयएसएफ जवानांचा मृत्यू झाला.

ही घटना मंगळवारी संध्याकाळी बसोहली परिसरातील सेवा जलविद्युत प्रकल्पाजवळील सीआयएसएफ कॅम्पमध्ये घडली.

माहितीनुसार, सेवा जलविद्युत प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. ड्युटी बदलाच्या वेळी जवानांमध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या वादानंतर एका हेड कॉन्स्टेबलने सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ही घटना हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्याच्या सीमेजवळील बसोहली भागात सेवा जलविद्युत प्रकल्प परिसरात घडली आहे. सुरुवातीच्या वृत्तात चार जवान गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले होते; त्यानंतर त्यांच्या मृत्यूची माहिती समोर आली.

गोळीबारात सहाय्यक कमांडंट अंकित कुमार पांडे, सब-इन्स्पेक्टर लक्ष्मण सिंह आणि कॉन्स्टेबल संदीप कुमार आणि मोहम्मद रफीक यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला चौघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी हिमाचल प्रदेशातील एनएचपीसी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

:

ठाण्यात उबाठा नेते प्रदीप 'बाळा' पूर्णेकर यांच्यावर गोळीबार

सामना एकीकडे, पाकिस्तानी व्हॉलीबॉल संघ गेला दुसरीकडे

आंदोलन केले तर 'कॉक्रोच'ना दादरकर देणार दणका

बांगलादेशात अणुइंधन नेणाऱ्या रशियन विमानाला पाकने एअरस्पेस नाकारली

गोळीबार करणाऱ्या जवानाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडील सर्व्हिस रायफलही जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. घटनेनंतर काठुआ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सीआयएसएफ मुख्यालयाने स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत. गोळीबारामागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासातून स्पष्ट होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka