Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कॉकरोचच्या आंदोलनापूर्वी ५० गुन्हेगारांसह ५०० जण ताब्यात

कॉकरोचच्या आंदोलनापूर्वी ५० गुन्हेगारांसह ५०० जण ताब्यात

दिल्लीत पोलिसांची कारवाई

'कॉकरोच जनता पार्टी'च्या (सीजेपी) जंतर-मंतरवरील आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. विविध ठिकाणांहून गटागटाने दिल्लीत दाखल झालेल्या सुमारे ५०० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याशिवाय, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या जवळपास ५० जणांनाही संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

जंतर-मंतर येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आंदोलनकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने दिल्लीत दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी विविध प्रवेशमार्गांवर तपासणी वाढवली आहे. जंतर-मंतर आणि संसद मार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग करण्यात आले असून, अनेक ठिकाणी सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.

सुरक्षा व्यवस्थेच्या नियोजनासाठी नवी दिल्ली जिल्ह्याचे २० विभागांत विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र ताबा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना ठेवण्यासाठी राजधानीतील काही स्टेडियमचाही तात्पुरत्या ताबा केंद्रांप्रमाणे वापर केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना छत्रसाल स्टेडियम, राजीव गांधी स्टेडियम, यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सूरजमल स्टेडियम तसेच दौलतपूर आणि पांड्रवाल येथील सामुदायिक केंद्रांमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

दीपके, रांका, सौरव दासला पोलिसांनी विमानातच घेतले ताब्यात

आंदोलनापूर्वीच ध्रुव राठीला घरातून उचलले

भारतावर शुल्क लादणारे ट्रम्प आता डिझेलसाठी पुतीन यांच्या दारी

अमेरिकेच्या ग्रीन कार्ड निर्णयावर भारताचा स्पष्ट इशारा

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील मेट्रो सेवांवरही परिणाम झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४६ मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात आली आहेत. राजधानीच्या प्रवेशमार्गांवर वाहनांची तपासणी वाढवण्यात आली असून, गर्दी आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. २० जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान निर्माण झालेल्या परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवणे, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू न देणे, हा या कारवाईमागील उद्देश असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka