Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कोथिंबिरीचे भाव कडाडले! किलोचा दर २०० रुपयांच्या पार

कोथिंबिरीचे भाव कडाडले! किलोचा दर २०० रुपयांच्या पार

आवक घटल्याने किरकोळ बाजारात दरांची झेप

मुसळधार पावसामुळे पुरवठा विस्कळीत झाल्याने कोथिंबिरीच्या दराने थेट किलोमागे २०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. विशेषतः महाराष्ट्रातील नाशिक परिसरात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे कोथिंबिरीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून, दिल्लीसह उत्तर भारतातील बाजारपेठांमध्ये आवक घटली आहे.

दिल्लीतील आझादपूर मंडईमध्ये ताजी कोथिंबीर काही दिवसांपूर्वी १७५ रुपये किलोपर्यंत पोहोचली, तर किरकोळ बाजारात तिचा दर २२० ते २३० रुपये किलोपर्यंत गेला. याच काळात घाऊक दर काही वेळासाठी २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. विशेष म्हणजे या कालावधीत साधारण घाऊक दर केवळ २५ रुपये किलोच्या आसपास असतो. त्यामुळे यंदाची दरवाढ किती तीव्र आहे, याचा अंदाज येतो.

नाशिक हे उत्तर भारतातील बाजारपेठांना कोथिंबीर पुरवठा करणाऱ्या प्रमुख केंद्रांपैकी एक आहे. नाशिक परिसरातील कोथिंबीर साधारणपणे इंदूरमधील कोल्ड स्टोरेजमध्ये पाठवली जाते आणि त्यानंतर दिल्लीसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये रवाना होते. मात्र जुलैअखेर झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले, तर वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला. परिणामी लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी योग्य दर्जाची कोथिंबीर उपलब्ध होणे कठीण झाले आहे.

घाऊक महागाईत किंचित घट; जुलैमध्ये दर ९.७८ टक्क्यांवर

जंतर-मंतर आंदोलनात दिसलेला व्यक्ती निघाला फसवणूक प्रकरणातील आरोपी

५ वर्षात महाराष्ट्रात ३६ हजार २११ कंपन्या बंद पडल्या?

दरम्यान, नाशिकमध्ये सुमारे महिनाभरापूर्वीच चांगल्या दर्जाच्या हिरव्या कोथिंबिरीची उपलब्धता कमी झाली होती आणि स्थानिक दर जवळपास १३० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. बंगळुरू आणि लातूरसारख्या इतर उत्पादक केंद्रांतूनही आवक घटल्याने बाजारावरील दबाव आणखी वाढला. कर्नाटकातून काही प्रमाणात कोथिंबिरीचा पुरवठा होत असला, तरी आवक मर्यादित असून तिचा दर्जाही तुलनेने कमी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात पालेभाज्यांचे दर अचानक अनेक पटींनी वाढू शकतात. कारण या भाज्या नाशवंत असल्याने काही दिवसांचा वाहतूक विलंब किंवा पिकांचे नुकसान झाले तरी बाजारात उपलब्धता झपाट्याने कमी होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka