Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लेहमध्ये कोसळलेल्या 'चीता' हेलिकॉप्टरचे फोटो व्हायरल

लेहमध्ये कोसळलेल्या 'चीता' हेलिकॉप्टरचे फोटो व्हायरल

हेलीकॉप्टरचे नुकसान पण सैनिक बचावले

लेह परिसरात भारतीय लष्कराचे 'चीता' हेलिकॉप्टर कोसळून मोठा अपघात झाल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही. हेलिकॉप्टर चालवणारे लेफ्टनंट कर्नल आणि मेजर दर्जाचे अधिकारी जखमी झाले आहे.

त्यांच्यासोबत बसलेले तिसऱ्या इन्फंट्री डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग, मेजर जनरल सचिन मेहता हे देखील जखमी झाले आहेत. या अपघातात हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर, सैनिकांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यात अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील तीन अधिकारी डोंगरावर बसून विजयाचे चिन्ह दाखवत आहेत. शेजारीच हेलीकॉप्टर देखील आहेत. फोटोमध्ये धोकादायक भूभागात सैनिक जमिनीवर पडलेले स्पष्टपणे दिसत आहेत. अपघातातून तिन्ही सैनिक चमत्कारिकरित्या बचावले. सर्व सैनिक जमिनीवर पडलेले असताना, मेजर जनरल मेहता यांनी त्यांच्या मोबाईल फोनने सेल्फी काढला आणि काही अंतरावर बसलेल्या असलेल्या एका सैनिकाने त्यांना विजयाचे चिन्ह दाखवले. जवळच चीता हेलिकॉप्टरचा ढिगारा दिसत आहे.

लष्कराने एक निवेदन जारी करून सांगितले की, अपघातातून तिन्ही सैनिक चमत्कारिकरित्या बचावले आहेत. लष्कराने सांगितले की, हा अपघात २० मे रोजी झाला असून, तपशील अद्याप जाहीर केला जात आहे. लष्कराने सांगितले की, अपघातात तिन्ही अधिकारी जखमी झाले असले तरी ते सुरक्षित आहेत. लष्कराने असेही सांगितले की, जनरल ऑफिसर कमांडिंग हे देखील हेलिकॉप्टरमध्ये होते. दोन्ही वैमानिकही सुरक्षित आहेत.

पुलवामाचा मास्टरमाइंड हमझाच्या अंत्यविधीला नामचीन दहशतवादी

देशभर उष्णतेचा कहर; जगातील ५० सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये सर्व शहरं भारतातील

पेट्रोलच्या दरात ८७ पैशांनी, डिझेलच्या दरात ९१ पैशांची वाढ

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री कोलकात्याहून दिल्लीसाठी रवाना; पंतप्रधान मोदींची घेणार भेट

जास्त उंचीवर हेलिकॉप्टर उडवणे हे सामान्यतः अत्यंत कठीण मानले जाते. त्यामुळे, लेहसारख्या दुर्गम भागात सैनिकांचे सुरक्षितपणे वाचणे हे चमत्कारापेक्षा कमी नाही. छायाचित्रांमध्ये सर्व सैनिक सुखरूप दिसत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत हेलिकॉप्टर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, त्याचे पंख आणि पुढचा भाग पूर्णपणे खराब झाला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka